तरुण भारत

लष्कराचा गणवेश घातलेल्या संशयितास मेरठमध्ये अटक

ऑनलाईन टीम / मेरठ : 

मेरठच्या कॅन्टोन्मेंट परिसरात लष्कराचा गणवेश घातलेल्या एका संशयिताला लष्कराच्या गुप्तचर यंत्रणेने आज अटक केली. चौकशीनंतरगुप्तचर यंत्रणांनी त्याला मेरठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. 

Advertisements

संजय निवासी असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तो गाझियाबादचा रहिवाशी आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, संजय निवासी याला मेरठमध्ये एका टेलरने नोकरी दिली आहे. तेथून त्याने लष्कराचा गणवेश मिळवला. पण लष्कराचा गणवेश परिधान करण्यामागचा त्याचा नेमका उद्देश काय होता, याची चौकशी सुरू आहे.लष्कराचा गणवेश परिधान केल्याप्रकरणी त्याच्यावर इन्चौली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास इन्चौली पोलीस करत आहेत. 

Related Stories

डॉक्टरांवर हल्ल्यांप्रकरणी एफआयआर नोंदवा

Patil_p

भारत-जपान संबंध अत्यंत बळकट

Patil_p

‘जेएनयू’तील विद्यार्थ्यावर देशद्रोहाचा गुन्हा

Patil_p

पंजाबमध्ये दिवसभरात 402 नवे कोरोना रुग्ण; 16 मृत्यू

Rohan_P

डॉक्टर, पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा : अझरुद्दीन

prashant_c

इन्फोसिसचे बाजार भांडवल 7 लाख कोटींवर

Patil_p
error: Content is protected !!