तरुण भारत

गलवानमध्ये 60 हून अधिक चिनी सैनिक ठार

अमेरिकेच्या वृत्तपत्राकडून खुलासा : जिनपिंग यांच्या आक्रमकतेमुळे पीएलए अपयशी

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

Advertisements

न्यूज वीक या अमेरिकेच्या वृत्तपत्राने गलवान खोऱयातील संघर्षाबाबत चकित करणारे खुलासे केले आहेत. वृत्तपत्रानुसार 15 जून रोजी गलवानमध्ये झालेल्या झटापटीत चीनचे 60 हून अधिक सैनिक मारले गेले होते. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग हेच भारतीय क्षेत्रात आक्रमक हालचाल घडवून आणू पाहत होते, परंतु त्याची पीपल्स लिबरेशन आर्मी यात सपशेल अपयशी ठरली आहे.

भारतीय सीमेवरील चिनी सैन्याच्या अपयशाचे परिणाम समोर येणार आहेत. चिनी सैन्याने या अपयशानंतर जिनपिंग विरोधकांना हाकलण्याचे काम सुरू केले आहे. या कारवाईत वरिष्ठ अधिकाऱयांवर कुऱहाड कोसळणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या अपयशामागे चीनचे आक्रमक शासक क्षी जिनपिंग हेच कारणीभूत आहेत. तेच पक्षाच्या सेंट्रल मिलिट्री कमिशनचे अध्यक्ष असल्याने पीएलएचे प्रमुख आहेत.

पीएलएची घुसखोरी वाढली

मेच्या प्रारंभीच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या दक्षिणेत चीनचे सैन्य पुढे सरकले होते. तेथे लडाखमध्ये तीन विविध ठिकाणी भारत-चीनदरम्यान तात्पुरती सीमा आहे. सीमा निश्चित नसल्याने पीएलए भारताच्या हद्दीत शिरत असते. विशेषकरून 2012 मध्ये क्षी जिनपिंग हे पक्षाचे महासचिव झाल्यावर हे प्रकार वाढले आहेत.

भारतीयांकडून शौर्याचे प्रदर्शन

गलवानमध्ये भारत-चीनदरम्यान झालेली झटापट दोन्ही देशांमध्ये 40 वर्षांनंतरचा पहिला धोकादायक प्रसंग होता. वादग्रस्त भागांमध्ये घुसणे चीनची सवय आहे. दुसरीकडे गलवानमध्ये भारतीय सैन्याने चिनी सैन्याला चांगलाच इंगा दाखविला आहे. तेथे चीनचे कमीत कमी 43 सैनिक मारले गेले आहेत. हा आकडा 60 हून अधिक होऊ शकतो. भारतीय सैनिक शौर्याने लढले होते. चीन स्वतःला झालेले नुकसान कधीच सांगणार नसल्याचे वृत्तपत्राने नमूद केले आहे.

बोल्ड अँड बेटर

ऑगस्टच्या अखेरीस 50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच भारताने आक्रमक भूमिका स्वीकारली. ज्या उंचीवरील भागांवर चीनने ठाण मांडले होते, तेथे भारताने पुन्हा स्वतःचा ताबा मिळविला आहे. उंचीवरील भागांवर कब्जा करण्याचा प्रयत्न भारतीय सैनिकांनी हाणून पाडल्यावर चिनी सैनिक अवाप् झाल्याचे अमेरिकेच्या वृत्तपत्राकडून सांगण्यात आले. एकेकाळी चीनकडे असलेले बहुतांश दक्षिणी भाग आता भारताच्या ताब्यात आहेत. भारत घुसखोरांना संधीच देत नसल्याचे चित्र आहे. भारतीय सैनिकांना अधिक आक्रमक म्हणता येईल, परंतु प्रत्यक्षात ते बोल्ड अँड बेटर असल्याचे उद्गार वृत्तपत्राकडून काढण्यात आले आहेत.

Related Stories

अमेरिकेची अर्थसंकल्पीय तूट उच्चांकी स्तरावर

Patil_p

अमेरिकेतील वृद्धांमध्ये कोरोना लसीचे भय

Patil_p

इजिप्तमध्ये बदल घडवून आणणारी सबा सक्र

Patil_p

इस्रायलमध्ये योगदिन उत्साहात साजरा

Amit Kulkarni

अमेरिकेत कोरोनाबाधितांनी गाठला 55 लाखाचा टप्पा

datta jadhav

फ्रान्समध्ये निर्बंध

Omkar B
error: Content is protected !!