तरुण भारत

मोजक्याच वाळू व्यावसायिकांवर वक्रदृष्टी का?

प्रतिनिधी/ चिपळूण

तुमची मोजक्याच वाळू व्यावसायिकांवर वक्रदृष्टी का, असा सवाल आमदार भास्कर जाधव यांनी प्रांताधिकारी प्रवीण पवार यांना खरमरीत पत्र लिहून केला आहे. तसेच हातपाटी वाळू व्यावसायिकांचा पुळका असलेले राजकीय पुढारी दलाल असल्याचा आरोप करीत गोवळकोटमधील बेकायदा उत्खनन कधी थांबणार, असा प्रश्न विचारला आहे.

Advertisements

या पत्रात म्हटले आहे की, आपण उपविभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर कालुस्ते येथे बेकायदा होणाऱया वाळू उत्खननावर मोठी कारवाई केली. मात्र या कारवाईत वाळू उत्खनन व वाहतूक करणाऱयांकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर गोवळकोट येथे वाळू उत्खनन करणाऱया 9 होडय़ा बुडवल्या व काही दिवसांनी सर्व होडय़ा वर येऊन पुन्हा उत्खनन करू लागल्या. या काळात कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन व त्यासाठी नाकाबंदी असतानाही गोवळकोट येथून राजरोसपणे दिवसाढवळय़ा वाहतूक होत होती, ही बाब आश्चर्यकारक वाटते.

एखादा पोलीस निरीक्षक नव्याने रूजू झाल्यावर मटका, जुगार, दारूधंदे यांच्यावर कारवाई करून आपली जरब बसवून दबदबा वाढवतो. मात्र आपली आवक वाढल्यावर पुढे तेच धंदे जोमाने चालतात. आपलेही तसेच होणार, अशी शंका मला त्याचवेळी आली होती. कारण तुमची काही ठराविक वाळू व्यावसायिकांवर वक्रदृष्टी असल्याचे दिसत आहे. तुम्हाला बेकायदा वाळू व्यवसाय पूर्णपणे बंदच करायचे असतील तर सरसकट कारवाई करावी, जे राजकीय पुढारी आपल्याला निवेदने देऊन हातपाटी व्यावसायिकांचा पुळका असल्याचे दाखवत आहेत, ते पुढारी खरोखरच शासनाचा महसूल वाचवत आहेत. व्यावसायिकांना मदत करत आहेत की, व्यावसायिक व शासकीय अधिकारी यांच्यामध्ये आर्थिक दलाली करीत आहेत, याची खात्री करावी.

खाडीत असणाऱया शेकडो होडय़ांना व्ही. आर. सी. नाही. अशा होडय़ांवर संबंधित खात्याकडून कारवाई का करून घेतली जात नाही? रात्री-अपरात्री विशिष्ट लोकांवर कारवाई केल्याचे नाटक करण्याऐवजी गोवळकोट येथील शासकीय जागेत 50 पेक्षा जास्त उभ्या करून ठेवलेल्या होडय़ा जप्त का करत नाही, गोवळकोट येथे महसूलच्या जागेत कायम अवैध वाळूसाठा असतो. त्यावर का कारवाई करीत नाही, असे अनेक प्रश्न विचारत सरसकट कारवाई न केल्यास अन्यायग्रस्त व्यावसायिक उपोषणाला बसतील, असा इशारा दिला आहे.

बाहेरील तालुक्यातील वाळूवर कारवाई करा

सध्या महाड, खेड, संगमेश्वर-माखजन येथून मोठय़ा प्रमाणात अवैध वाळू येथे येत आहे. तरी त्यांच्यावरही कारवाई करा, अशी मागणी जाधव यांनी केली आहे.

उपोषणवाले राजकीय हस्तक

आपल्याला निवेदन देऊन काही लोकांवर कारवाई करा, अन्यथा आम्ही उपोषणाला बसू, अशी धमकी देणारे अवैध धंदे व्यावसायिक व राजकीय पुढाऱयांचे हस्तक असल्याची टीका त्यांनी या पत्रात केली आहे.

Related Stories

टाळेबंदी काळात जिल्हय़ात खासगी सावकारीला जोर

Omkar B

जिल्हय़ात आणखी 17 पॉझिटिव्ह

NIKHIL_N

नगराध्यक्ष बडतर्फीबाबत चौकशी समिती नेमणार!

Patil_p

गरोदर महिलेला अडविल्याने प्रशासन-रहिवासी आमनेसामने

Patil_p

क्वारंटाईन केंद्रांना भावनेचीही किनार

NIKHIL_N

अल्पवयीन मुलीशी गैरप्रकार, तरूणाला 5 वर्षे सक्तमजुरी

Patil_p
error: Content is protected !!