तरुण भारत

लोकसभेचे 17 खासदार कोरोना पॉझिटिव्ह

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्व खासदारांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये 17 खासदारांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आज सकाळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी लोकसभेत ही माहिती दिली.

Advertisements

कोरोनाबाधित खासदारांमध्ये भाजपचे 12, वायएसआर काँग्रेस 2, शिवसेना, डीएमके आणि आरएलपीच्या एका खासदाराचा समावेश आहे. रविवारी 5 खासदारांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. उर्वरित 12 जणांचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आज सकाळी समजले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  अधिवेशनात खबरदारी घेण्यात येत आहे. आरोग्य मंत्रालयाच्या सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे.

लोकसभेत खासदारांना डेस्कच्या समोर काचेचे आवरणही लावण्यात आले आहे. खासदारांना उभे राहून बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. खासदार आपली उपस्थितीही डिजिटल पद्धतीने नोंदवतील. संसद भवनात संपूर्णपणे डिजिटल पत्रव्यवहार होणार आहे. आज लोकसभेत 359 खासदारांची उपस्थिती होती.

Related Stories

दिल्लीत मागील 24 तासात 66 नवे कोरोना रुग्ण; 79 डिस्चार्ज!

Rohan_P

शहरातून गावात पाठविल्या जाणाऱया रकमेत घट

Patil_p

छटपूजेच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जनतेला दिल्या शुभेच्छा

Rohan_P

डिजिटल तंत्रज्ञानाचे कोरोनाशी संघर्षात मोलाचे साहाय्य

Patil_p

‘लवकर बरे होऊन घरी या’ : धनंजय मुंडेंना पंकजाताईंचा फोन

Rohan_P

दहशतवादी हल्ल्यात तीन नागरिकांचा मृत्यू

Patil_p
error: Content is protected !!