तरुण भारत

कार्लाइल समुहाची रिलायन्समध्ये गुंतवणूक

14.69 हजार कोटींची गुंतवणुकीची अपेक्षा : आगामी काळात अन्य कंपन्यांच्या समावेशावर भर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

कार्लाइल समूह भारताची रिलायन्स रिटेल वेंचर्स लिमिटेडमधील हिस्सेदारी खरेदी करण्याचे संकेत आहेत. माध्यमाच्या अहवालानुसार अमेरिकी कंपनी कार्लाइल रिलायन्स रिटेलमध्ये जवळपास 14.69 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची अपेक्षा आहे. यामध्ये मुकेश अंबानींच्या मालकीची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मागील आठवडय़ात सिल्वर लेकने 7500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा केलेली आहे.

कार्लाइल गुपची रिटेल क्षेत्रातील ही पहिलीच गुंतवणूक असणार आहे. भारतीय रिटेल क्षेत्रातील 2 अब्ज डॉलरची सदरची ही गुंतवणूक या क्षेत्रातील सर्वात मोठी सिद्ध होण्याची शक्यता आहे. अमेरिकी कंपनी भारतामधील ऑनलाईन आणि ऑफलाईन रिटेल कंपन्यांमधील गुंतवणूक करण्याबाबत विचार करते आहे. यात रिलायन्स रिटेल वेंचर्समध्ये गुंतवणुकीचाही समावेश राहणार आहे. उपलब्ध अहवालानुसार दोन्ही कंपन्यांमध्ये गुंतवणुकीसंदर्भात चर्चा सुरु आहे.

एक अन्य अमेरिकेची कंपनी सिल्वरलेक पार्टनर्सनेही मागील आठवडय़ात रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक करण्याची घोषणा करुन रिलायन्स रिटेलमध्ये 1.75 टक्क्मयांची हिस्सेदारी घेण्याचे संकेत आहेत.

अन्य गुंतवणूक मिळण्याची शक्मयता

माध्यम अहवालानुसार रिलायन्स रिटेल वेंचर्समध्ये केकेआर ऍण्ड कंपनी, मुबादला इन्वेस्टमेट आणि अबुधाबी इन्वेस्टमेंटकडून जवळपास 36.66 हजार कोटींची गुंतवणूक होण्याची शक्मयता आहे. या मदतीने रिलायन्स रिटेल वेंचर्स वर्ष 2020 मध्ये रिटेल बाजारात वेगळी उंची प्राप्त करण्याची अपेक्षा तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

Related Stories

ऍपलची 22 जूनपासून वर्ल्डवाइड डेव्हलपर्स परिषद

Patil_p

ऑनलाईन फार्मा उद्योगावर टाटाचे लक्ष्य

Patil_p

पतंजली समूहाची उलाढाल 30 हजार कोटींवर

Patil_p

कोरोनाच्या संकटात यामाहाचा ग्राहकांना दिलासा

Patil_p

ऑटो डीलर्सची 300 शोरुम्स बंद

Patil_p

प्रथमच देशातील विदेशी भांडवल 480 अब्ज डॉलरच्या घरात

tarunbharat
error: Content is protected !!