तरुण भारत

सोलापूर : ऑनलाईन शिक्षण पध्दतीने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत,वाढ कि अभाव

प्रतिनिधी / करमाळा

शिक्षण विभागामार्फत ‘शाळा बंद पण शिक्षण सुरू  या उपक्रमाअंतर्गत ऑनलाईन  शिक्षण हा उपक्रम राबविण्यात येत आहे . 8 मे रोजी केंद्र प्रमुखापासून ते राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची झूम अॅपवर वेबीनार मिटिगं झाली. या मिटिगंमध्ये शिक्षकानी सर्व विद्यार्थी व पालक यांचे व्हाट्सफ ग्रूप तयार करावेत, दिक्षा अॅपचा वापर करावा, विद्यार्थ्याना ऑनलाईन शिक्षण द्यावे, या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार स्मार्टफोनचा वापर करणाऱ्या काही पालकाना व्हाट्सफ  ग्रूपच्या माध्यमातून विविध शैक्षणिक लिंक, व्हिडीओ पोहोचवण्यात येत आहेत.
  
कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमिवर करमाळा  ग्रामीण भागातील विशेषतः साङे, सालसे, सौंदे, वरकटणे, वरकुटे,घोटी,मलवडी  या ठिकाणी  गोरगरीब पालकांना रोजगार उपलब्ध नसल्याने पालक आर्थिक अडचणीत आहेत. सर्वच पालकाकडे स्मार्टफोन नाहीत. ग्रामीण भागात वाडी वस्तीवर मोबाईलला रेंज असेलच असे नाही. त्यामूळे बहुसंख्य विदयार्थी शिक्षणापासून वंचित आहेत .

ऑनलाईन शिक्षण प्रक्रीयेत विद्यार्थी -शिक्षक समोरासमोर नसल्याने अध्ययन होण्यासाठी आवश्यक असलेली विदयार्थी- शिक्षक आंतरक्रीया होत नाहीत. विद्यार्थी प्रतिसादाची अचूक नोंद घेणे जिकीरीचे आहे. ज्या कुटूबांत एका पेक्षा अधिक विदयार्थी आहेत, तिथे फोन वापरण्यावरुन तणाव निर्माण होत आहे . अभ्यासाऐवजी अनेक लिंकवर उपलब्ध असलेले खेळ व अनावश्यक व्हीडीओ पहाण्याकडे विद्यार्थ्याचा कल असल्याचे चित्र दिसून येत आहे .त्याचबरोबर  एकाच  व्हाट्सफ ग्रूप वर आल्यावर काही मत-मतांतरे होऊ शकतात .एखादयाने वादग्रस्त मेसेज अथवा मजकूर टाकल्यास विनाकारण वाद निर्माण होत आहेत . आणि सध्या जी आकडेवारी “वर्क फ्राॅम होम” ची वरिष्ठ कार्यालयाला दिली जाते, ती वस्तूनिष्ठ आहे का ? हा चर्चेचा विषय ठरला आहे. 
 
प्राथमिक शाळेतील विदयार्थ्याचा वयोगट लक्षात घेता त्यांना सुट्टीचा आंनद घेता यावा, म्हणून असे कोणतेही उपक्रम राबविण्यात येऊ नयेत ,ते स्थगित करण्यात यावेत. कोरोना विषाणू प्रतिबंधीत कार्यात सुट्टीत नेमलेल्या शिक्षकाना कर्तव्य कालावधी समजून अर्जित रजा शिक्षकांच्या खाती जमा करण्यात यावी,अशी माहिती समोर येत आहे.  

Related Stories

लग्न सोहळयास जाणार्‍या स्कार्पिओ गाडीस ब्रम्हपुरीजवळ अपघात; आठ प्रवाशी जखमी

Abhijeet Shinde

अजित पवारांचे मेहुणे अमरसिंह पाटील यांचे निधन

prashant_c

पर्यावरण संमेलानाध्यक्षपदी अतुल धामणकर

prashant_c

कवठेगावाजवळ अपघात; कर्नाटकातील चार मित्रांचा मृत्यू

Sumit Tambekar

सोलापूर : बॅडमिंटन,जलतरण खेळास परवानगी : जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

सोलापूर : तुंगतमधील बोगस डॉक्टरवर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde
error: Content is protected !!