तरुण भारत

पडिलें मौन वैखरिये

श्रीकृष्णाने चेष्टा केल्याने काकुळतीला आलेल्या रुक्मिणीचे वर्णन करताना महामुनी शुकदेव पुढे म्हणतात-

नयनींचे सकज्जल बाष्पबिंदु । श्वेतवसनीं स्रवती विशदु । शोण सकुंकुम कुचस्वेदु । वसन भेदूनि प्रकटला । सितासिता उभय सरितां । माजी सरस्वती ते शोणता।  त्रिवेणीसंगम हृदयावरुता । माधव नेत्रीं अवलोकी । भगवन्मुखींचें अप्रिय वचन । परम कडवट मरणाहून।  श्रवणीं पडतांचि खिळिलें वदन । पडिलें मौन वैखरिये।

Advertisements

नखांच्या लालिम्यामुळे सुंदर दिसणाऱया पायाच्या नखाने ती जमीन उकरू लागली. डोळय़ांतील काजळाने काळे झालेले अश्रू केशराने रंगलेली वक्षस्थळे धुऊ लागले. ती मान खाली घालून उभी राहिली. अत्यंत दु:खाने तिच्या तोंडून शब्द फुटेना.

सुदु:ख म्हणजे काय म्हणसी । तरी अप्रियवाक्मयशवणासरसी ।  महाभय काळजी मानसीं । आनंदकोशीं झळंबली । अप्रियोक्तीचें नसतां काज । आजि कां वदला गरुडध्वज।  यावरी माझ्या त्याग सहज । हें दृढ बीज शंकेचें । सशोक ऐसिये शंकेकरूनी । अनुतापवितर्क करितां मनीं ।  बुद्धि गेली हारपोनी। धैर्यापासोनि सांडवली । विगतधैर्यें रुक्मिणीचीं। हस्तापासूनि वलयें साचीं ।  गळोनि पडलीं परी तयांची । शुद्धि अणुमात्र नुपलभे ।धरिला होता वालव्यजन । गळोनि पडला हस्तांतून । मुखभा गेली हारपोन । विवर्ण वदन रुदनेंसी । अकस्मात पावली मोह । मूर्छा वैकल्य जाकळी देह ।  तया सांवराया रोह। अधैर्य धैर्या करूं न दे । प्रचंडवातें जैसी कदळी । तेंवि उलथली भूमंडळीं ।  सुटली केशांची मोळी । ते वदनपाळी विखुरली ।

आत्यंतिक व्यथा, भय आणि शोकामुळे तिची विचारशक्ती लोप पावली, वियोगाच्या शंकेने ती इतकी दुबळी झाली की, तिच्या मनगटातील बांगडय़ा ओघळू लागल्या. हातातील चवरी गळून पडली. बुद्धी व्याकूळ झाल्याने तिला एकाएकी घेरी येऊ लागली. आणि वाऱयाने केळ उन्मळून पडावी, त्याप्रमाणे केस विस्कटून ती जमिनीवर कोसळली.

ऐसी चिन्हे वल्लभेआंगीं। देखोनि कळवळिला शार्ङ्गी ।  प्रेमवात्सल्य ये प्रसंगीं । श्रीशुकयोगी वर्णितसे। आपुल्या वाग्बाणीं भेदलें हृदय । तेणें रुक्मिणी प्रेतप्राय। तें देखोनि यादवराय । परम सदय कळवळिला । नेणोनि हास्यरहस्यखोली । भीमकी वाग्बाणीं भंगली ।  ऐसियेवरी करुणा आली । मग आदरिली अनुकंपा । पूर्विलाहूनि प्रेमा वृद्धी । पावे ऐसी लक्षूनि बुद्धि ।  करिता झाला कृपानिधि । तें शुक बोधी नृपातें ।

भगवान श्रीकृष्णांच्या लक्षात आले की, विनोदाचे मर्म लक्षात न आलेल्या रुक्मिणीची माझ्यावरील अत्यंत प्रेमामुळे अशी अवस्था झाली आहे. स्वभावत:च दयाळू असणाऱया श्रीकृष्णांचे मन तिच्याबद्दलच्या करुणेने भरून आले.

रुक्मिण्यवस्थेचा प्रकार। देखोनियां अभ्यंतर।  द्रवलें तेणें अतिसत्वर । मंचकावरूनि उतरूनी । द्विभुज सर्वत्र मुरारि । वर्तत असतां यादवभारिं ।  रुक्मिणीवैकल्य देखूनि नेत्रीं। बाहु चाऱही प्रकटिले ।

चहूं भुजीं केलें काय । तो परियेसीं अभिप्राय ।  एक्मया हस्तें रुक्मिणीकाय । सांवरूनियां बैसविला

Ad.  देवदत्त परुळेकर

Related Stories

डिजिटल ‘वार’

Patil_p

लोकांच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण नको

Patil_p

रसेल फॉस्टर सापडले

Patil_p

आकाश फाटले, ठिगळे कुठे लावणार?

Patil_p

उत्पादक घटक आत्मनिर्भर व्हावा

Patil_p

‘राम’ दहन करतो रावणाचा ‘काम’

Patil_p
error: Content is protected !!