तरुण भारत

पावसामुळे बळीराजाची वाढली चिंता

प्रतिनिधी/ रत्नागिरी

रत्नागिरी जिह्यात गेले सलग दोन दिवस हलका ते मध्यम पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे उभे भातपिक आडवे होण्याचा धोका वाढला आहे. हवामान विभागानेही 16 सप्टेंबरपर्यंत कोकणात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मच्छीमारांनाही सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत. 

   जिह्यात सोमवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत सरासरी 15.86 तर एकूण 142.70 मिमी पाऊस झाला. शुक्रवारी रात्रीपासून पावसाच्या अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. शनिवारी सकाळी संततधार सुरू होती. रविवारी सकाळपासून दमदार सरी कोसळत होत्या रात्री देखील जोरदार पाऊस बरसला. सोमवारी देखील ढगाळ वातावरणामुळे शेतकऱयांच्या चिंतेत वाढ झाली आह़े

     वातावरण बदलाचा परिणाम म्हणून समुद्रही खवळला आहे. मच्छिमारीसाठी बाहेर पडलेल्या अनेक नौका सुरक्षिततेसाठी, मिरकरवाडा, जयगड बंदरात आश्रयाला दाखल झाल्या आहेत.  वादळाची परिस्थिती लक्षात घेता मच्छीमार बांधवानी सावधानता बाळगावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Related Stories

देव रामेश्वर देवस्थानच्या शाही गणेशोत्सवाची सांगता

NIKHIL_N

चाकरमान्यांना आपुलकीची वागणूक द्या!

NIKHIL_N

कुडाळ नगराध्यक्षांचे आजपासून रत्नागिरीत बेमुदत उपोषण

NIKHIL_N

कोरोनामुळे उद्याच्या दहिकाल्याचा माहोलही शमला

Patil_p

कोकणनगर पोलीस चौकीसमोर दोन गटात राडा

Patil_p

कारवाईमुळे जलक्रीडा पर्यटन व्यावसायिक आक्रमक

NIKHIL_N
error: Content is protected !!