तरुण भारत

अलारवाड क्रॉस येथे होणार उड्डाणपूल

प्रतिनिधी/ बेळगाव

राष्ट्रीय महामार्गाच्या रिंगरोडकरिता भू-संपादनास उच्च न्यायालयाची स्थगिती आहे. तरीदेखील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मंडळाने आपले कामकाज सुरूच ठेवले आहे. राष्ट्रीय महामार्ग ते येडियुराप्पा मार्गाला जोडण्यासाठी अलारवाड क्रॉस येथे उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

राष्ट्रीय महामार्ग अलारवाड क्रॉस ते मच्छेदरम्यान रिंगरोड निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. याकरिता भू-संपादनाची प्रक्रिया यापूर्वी राबविण्यात आली आहे. मात्र, भू-संपादनामुळे हजारो एकर पिकावू जमीन नष्ट होणार असल्याने शेतकऱयांनी विरोध दर्शवून भू-संपादनाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे भू-संपादनाला स्थगिती आहे. भू-संपादन प्रक्रियेला स्थगिती असली तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मंडळाने रिंगरोडकरिता हालचाली सुरूच ठेवल्या आहेत. काही ठिकाणी खांब बसवून हद्द निश्चित करण्यात आली आहे. राष्ट्रीय महामार्गाजवळ उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग ते येडियुराप्पा मार्गाला जोडणारा रस्ता आहे. अलारवाड क्रॉस येथे चौक असल्याने चौकातून विविध ठिकाणाहून येणारी वाहने येडियुराप्पा मार्गाने शहरात प्रवेश करतात. मात्र या चौकातूनच मच्छेला जोडणारा रिंगरोड जातो. त्यामुळे शहरात प्रवेश करणाऱया वाहनांना अडथळा निर्माण होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे या चौकात उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हलगा गावाकडून येणारा सर्व्हिस रोड या चौकात जोडतो. तसेच राष्ट्रीय महामार्गावरून शहरात येणारी वाहने या चौकामधूनच प्रवेश करतात. त्यामुळे हलगा-मच्छे बायपास रस्त्यावरील वाहनांना अडथळा होऊ नये याकरिता उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. राष्ट्रीय महामार्ग ते येडियुराप्पा रोड या दरम्यान उड्डाणपुलाची उभारणी करण्यात येत आहे. सदर कामाची सुरुवात करण्यात आली असून, येथील चौकात खोदाईचे काम सुरू आहे. या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग व हलगा सर्व्हिस रस्त्याने येणाऱया वाहनांसाठी पुलाची उभारणी करण्यात येत आहे. सदर काम युद्धपातळीवर सुरू असून उड्डाणपुलाची उभारणी करण्याचे काम बेंगळूर येथील कंपनीला देण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 

Related Stories

कोविड इस्पितळात बेडची नेमकी संख्या किती?

Patil_p

पिरनवाडीत पुतळा बसवण्यावरून वाढला तणाव

Rohan_P

हुतात्मा चौक गणेशोत्सव मंडळातर्फे सुरेश अंगडी यांना श्रद्धांजली

Rohan_P

शुक्रवारीही पावसाची हजेरी

Patil_p

विघ्नहर्त्याचे आज आगमन

Patil_p

बेळगाव जिल्ह्यात गुरुवारी नव्याने 259 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Rohan_P
error: Content is protected !!