तरुण भारत

शिक्षक प्रशिक्षण सक्तीचा घाट

प्रतिनिधी/ बेळगाव

अध्यापनास पुरक ठरेल असे शिक्षक प्रशिक्षण बेळगाव जिल्हयात आयोजित करण्यात आले आहे. मात्र कोरोनाचा विळखा असताना देखील करण्यात आलेली शिक्षक प्रशिक्षणाची घाई शिक्षकांसाठी समस्येची ठरत आहे. प्रशिक्षणात दाखल असणाऱया अधिकारी-शिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे चित्र समोर येत असतानाच शिक्षक प्रशिक्षण सक्तीचा घाट करण्यात येत असून यामुळे शिक्षकांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मात्र सरकारी काम आणि बारा महिने थांब याचाच प्रत्यय या शिक्षक प्रशिक्षणाच्या बाबतीत देखील येत आहे. निवेदन, विरोध याच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊ नये अशी मागणी करण्यात आली असली तरी जीवन कौशल्य प्रशिक्षणाचे 10 दिवस उलटले तरी परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसून येत आहे.

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी दरवर्षी शिक्षकांना शाळा सुरु होण्यापुर्वी प्रशिक्षण दिले जाते. मात्र कोरोनाच्या संकटात स्प्टेंबर महिन्यात प्रशिक्षणाचा घाट घालण्यात आला असून यामुळे शिक्षकांची अडचण झाली आहे. दिवसभर प्रशिक्षण सुरु असून प्रशिक्षणात सहभागी झालेल्या शिक्षकांनाचा कोरोनाची लागण झाली असल्याचे चित्र समोर येत आहे. परिणामी संबंधित शिक्षकांशी संपर्क आलेल्या शिक्षकांमध्ये भिती निर्माण झाली आह. मात्र प्रशिक्षणाची सक्ती व वेंळेत हजेरी याकडे डाएटतर्फे विशेष लक्ष देण्यात येत असल्याने शिक्षकांना प्रशिक्षणाला वेळेत हजर राहण्याबरोबरच पुर्ण लाभ घेण्याची सक्ती करण्यात आली आहे. यामुळे कोरोनाचे संकट एका बाजूला आणि प्रशिक्षण एका बाजूला असे चित्र अनुभवायला मिळत आहे.

प्रशिक्षण कालावधी 10 दिवसांचा

शिक्षकांना देण्यात येणारे प्रशिक्षण 10 दिवसाचे आहे. जीवनकौशल्य व विषयनिहाय प्रशिक्षण असे दोन विभाग करण्यात आले आहेत. जीवनकौशल्य प्रशिक्षणाचा 5-5 दिवसांचा टप्पा सुरु आहे. यानंतर विषयावर आधारीत प्रशिक्षणाला सुरुवात होणार आहे. प्रशिक्षणाला येणारे शिक्षक विविध भागातून येतात. यामुळे  त्यांचा अनेकांशी संपर्क आलेला असतो. यामुळे प्रशिक्षणात असणारे शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह येत आहेत. त्यातच दिवसभर प्रशिक्षण असल्याने शिक्षकांचा परस्परांशी संपर्क अधिक येत आहे. यामुळे प्रशिक्षणाची घंटा शिक्षकांसाठी धोक्याची असली तरी सक्तीमुळे  शिक्षक मात्र ऑन डयुटीच आहेत. 

Related Stories

टास्कफोर्स समितीवर कोरोना नियंत्रणाची जबाबदारी

Patil_p

बेळगावात पोलिसांना कोरोनाचा धोका वाढला

Rohan_P

बेळगाव जिल्हय़ाच्या प्रत्येक तालुक्यात होणार कोविड रूग्णालय

Rohan_P

काजू शेतकऱयांना मदत करणारा ‘माफिया’ होत नाही

Patil_p

बेळगावातून क्वारंटाईन मधून 79 जणांची सुटका

Rohan_P

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मेंढय़ा विक्रीला अल्प प्रतिसाद, मेंढपाळ चिंताग्रस्त

Rohan_P
error: Content is protected !!