तरुण भारत

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया कोरोना पॉझिटिव्ह

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :


दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली. 

Advertisements


ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले, सौम्य ताप येत असल्यामुळे मी माझी कोरोना चाचणी केली. त्या चाचणीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे मी स्वतः ला आयसोलेट केले आहे. सध्या तरी ताप किंवा अन्य कोणतीही लक्षणे नाही आहेत. लवकरच तुमच्या सर्वांच्या सदिच्छा आणि शुभेच्छांमुळे माझी तब्येत लवकरच सुधारेल आणि मी पूर्ण बरा होऊन कामावर परत येईन. 


यापूर्वी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. 17 जून रोजी त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. त्यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील राजीव गांधी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. मात्र त्यानंतर आणखी प्रकृती बिघडल्यावर त्यांना साकेतमधील मैक्स रुग्णालयात उपचार करण्यात आले त्यानंतर 26 जून रोजी त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. 


दरम्यान, सध्या दिल्लीत कोरोना बाधितांची एकूण संख्या 2 लाख 21 हजार 553 वर पोहचली आहे. यामधील 28, 641 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 1 लाख 88 हजार 122 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून आतापर्यंत 4,770 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

Related Stories

देशात 96.63 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav

उद्या परिवहनच्या बसेस, मेट्रो रेल्वे बंद

tarunbharat

उत्तराखंडमध्ये घटनात्मक संकट?

Patil_p

केंद्र शासित प्रदेशात एसएमएस सेवेस प्रारंभ

Patil_p

लडाखमध्ये ‘टँक रेजिमेंट’ सज्ज

Patil_p

गॅस सिलिंडर दरात 10 रुपयांनी कपात

Patil_p
error: Content is protected !!