तरुण भारत

देशात मागील 24 तासात 83,809 नवे कोरोना रुग्ण; 1054 मृत्यू

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 83 हजार 809 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1054 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 49 लाख 30 हजार 237 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 80 हजार 776 एवढी आहे. 

सध्या देशात 9 लाख 90 हजार 061 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 38 लाख 59 हजार 400 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

आतापर्यंत देशात 5 कोटी 83 लाख 12 हजार 273 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 10 लाख 72 हजार 845 रुग्णांची तपासणी सोमवारी एका दिवसात करण्यात आली. 

Related Stories

रंजीत दास आसाम भाजपाध्यक्ष

Patil_p

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा

prashant_c

वाराणसी : डिझेल रेल्वे इंजिन कारखान्याला आग

pradnya p

बैरुतमधील स्फोटासाठी निष्काळजीपणा कारणीभूत

Patil_p

19 जूनला होणार राज्यसभेच्या केवळ 18 जागांसाठी निवडणूक

pradnya p

कोरोना रूग्णसंख्येचा एकदिवशीय उच्चांक

Patil_p
error: Content is protected !!