तरुण भारत

ब्राझीलमध्ये 36 लाख रुग्ण कोरोनामुक्त

ऑनलाईन टीम / ब्रासिलिया : 

ब्राझीलमध्ये आतापर्यंत 43 लाख 49 हजार 544 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील 36 लाख 13 हजार 184 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

Advertisements

ब्राझीलमध्ये सोमवारी 19 हजार 089 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 454 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ब्राझीलमध्ये 6 लाख 04 हजार 243 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामधील 8 हजार 318 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. तर 1 लाख 30 हजार 474 जणांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत ब्राझीलचा जगात तिसरा क्रमांक लागतो. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 1 कोटी 45 लाख 05 हजार 652 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत अमेरिका पहिल्या तर भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत आतापर्यंत 67 लाख 49 हजार 289 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर भारतात ही संख्या 49 लाख 30 हजार 236 एवढी आहे. 

Related Stories

अल्जाइमर रोगासाठी पहिल्या औषधाला मंजुरी

Patil_p

रशियात विमान कोसळून 16 जणांचा मृत्यू

Patil_p

‘फायझर’ची लस घेतलेल्या डॉक्टरचा 16 दिवसात मृत्यू

datta jadhav

पॅरिस हवामान करारात अमेरिका पुन्हा सामील

Patil_p

श्वानासारख्या रोबोटमुळे अमेरिकेत खळबळ

Patil_p

ऑलिम्पिकमध्ये भारताचे दुसरे पदक निश्चित

datta jadhav
error: Content is protected !!