22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

आम आदमीच्या ‘गोवन्स अगेंस्ट करोना’ मोहिमेंतर्गत ऑक्सिमित्र उपक्रमास मांद्रे मतदार संघांत शुभारंभ

पालये :आम आदमी पक्षातर्फे राबविण्यात येणार्‍या ‘‘ऑक्सिमित्र‘‘ उपक्रमास मांद्रे मतदार संघांत पार्से व तेरेखोल येथील हुतात्मा स्मारकांना अभिवादन करून व ग्रामदेवतांचे दर्शन घेऊन सर्वांच्या चांगल्या आरोiयाची मागणी करीत ‘‘गोवन्स अगेंस्ट करोना” मोहोमेअंतर्गत ‘‘ऑक्सिमित्र‘‘ उपक्रमाचा थाटांत शुभारंभ करण्यात आला.
‘‘गोवन्स अगेंस्ट करोना‘‘ मोहिमेचे मांद्रे मतदार संघांतील प्रमुख ऍड.प्रसाद शहापूरकर,रोहिदास आरोलकर,यांनी पार्से गांवांतील श्री भगवती युनियन संघटनेतर्फे नागरिकांची प्राणवायू तपासणीसाठीचा देऊळवाडा पार्से येथे कार्यक्रम घेतला.त्यानंतर चावदेवाडा व अन्य शेजारील प्रभागांमध्ये भेट देऊन नागरिकांची प्राणवायू तपासणी केली.बामणवाडा येथे नागरिकांच्या घरी भेट देत नागाfरकांना ऑक्सिमिटरचे महत्व विशद केले.पार्से गांवांतील उर्वरित प्रभाग व घरे पुढील कांहि दिवसांत पूर्ण करण्यात येतील.पार्से येथे रोहिदास आरोलकर यांनी आपल्या निवासस्थानी ऑक्सिमिटर तपासणी केंद्र सुरु केले आहे.
तेरेखोल येथे हुताlमा गुरुजी व हुतात्मा शेषनाथ वाडेकर यांच्या स्मारकास अभिवादन करून ऑक्सिमित्र उपक्रमास सुरवात केली. स्थानिक पंच सदस्य आग्नेल गुदिन्हा॓ यांची भेट घेऊन ऑक्सिमिटर उपकरणाची माहिती दिली व सदर उपकरण कसे वापरावे याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.यावेळी येथील ऑक्सिमिटर तात्काळ उपलब्ध व्हावा यासाठी पंच सदस्य आग्नेल गुदिन्हा॓ याना ऑक्सिमिटर शरीर तापमान मोजणी यंत्र भेट दिले.‘‘गोवन्स अगेंस्ट करोना‘‘हि मोहिम अत्यंत प्रभावशाली व्हावी व प्रत्येक नागाfरकाला या मोहिमेची माहिती व्हावी यासाठी दोन टप्प्यांत विभागण्यात आले असून पाfहल्या टप्प्यांत मांद्रे,मोरजी,आगरवाडा,चोपडे आदी गांव घेण्यात येतील.व दुसर्‍या टप्प्यांत केरी,पालये,हरमल,तुये व विर्नोडा गांव घेण्यात येतील.सदर मोहिमेंतर्गत जे नागरिक विलगीकरणात आहेत व ज्यांना ऑक्सिमिटरची गरज आहे व त्यांना तो मिळाला नाहि त्यांच्यासाठी आपचे कार्यकर्ते ऑक्सिमिटरउपलब्ध करून देणार आहेत व विलगिकरणाचा कालावधी संपल्यानंतर तो परत केला जातो. आतांपर्यंत पार्से,मांद्रे,न्हायबाग या संबंधितांना उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे या उपक्रमाचे प्रमुख ऍड. शहापूरकर यांनी माहिती देताना स्पष्ट केले.करोना या रोगाच्या विरोधांत लढण्यासाठी एकजूट दाखवावी व या जनकल्याणाच्या कार्यांतसहभागी व्हावे असे आवाहनआम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.या मोहिमेंत आतांपर्यंत देवेंद्र प्रभुदेसाई,ऍड.विष्णू नाईक,आप सदस्य राहुल,एल्वसि मास्कारेन्हस,बाबलो आजगांवकर यांनी रोहिदास आरोलकर व ऍड.प्रसाद शहापूरकर यांच्या सोबत सहभाग घेतला.

Related Stories

बकरी ईद संदर्भात मुख्यमंत्र्यानी घेतली बैठक

Omkar B

40 टक्के कमिशन घेणाऱया अधिकाऱयांची सरकाने चौकशी करावी

tarunbharat

गुरुवारी 215 कोरोना पॉझिटिव्ह, 221 कोरोनामुक्त

Patil_p

पोलिसांवर गोळीबार करुन कैद्याचे पलायन

Omkar B

भाजप सरकार हे शेतकऱयांचे हित जोपासणारे ,भाटकारांचे नव्हे

Omkar B

पंचायत इमारतींतील गाळे वितरणासाठी समिती स्थापन

Patil_p
error: Content is protected !!