तरुण भारत

उत्तराखंड सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला ‘हा’ निर्णय

ऑनलाईन टीम / देहरादून : 


कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन उत्तराखंड सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. 21 सप्टेंबरपासून महाविद्यालये सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शिक्षण मंत्री अरविंद पांडे यांनी विभागीय अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. 


अनलॉक 4 च्या नियमानुसार, सरकारने ठरवले होते की, ऑनलाईन शिक्षण सुरु राहील आणि याला प्रोत्साहन देखील दिले जाईल. तसेच 21 सप्टेंबर पासून 50 टक्के स्टाफ शाळेत येईल. त्याबरोबरच असे देखील ठरवले होते की, कन्टोनमेंट झोन बाहेरील शाळांमध्ये इयत्ता 9 वी ते 12 वी चे विद्यार्थी 21 सप्टेंबर पासून शाळेत येतील, असेही सांगितले होते. 


मात्र, कोरोनाचे वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन, सरकारने आता अजूनही प्रदेशातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 


दरम्यान, प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या 33 हजार पेक्षा अधिक असून सद्य स्थितीत 10,374 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

Related Stories

उपचारास नकार देणाऱया खासगी रुग्णालयांवर कारवाई करणार

Rohan_P

15 रोजी संपणार टाळेबंदी : मुख्यमंत्री योगी

Patil_p

मध्यप्रदेशमधील एसबीआय बँकेच्या तिजोरीतून सोन्याचे 101 पॅकेट गायब, गुन्हा दाखल

pradnya p

एमडीएचचे मालक धर्मपाल गुलाटी यांचे निधन

pradnya p

सण-उत्सवातही जोखीम नको!

Patil_p

न्यायासाठी नव्हे राजकारणासाठी राहुल गांधींना जायचयं हाथरसला

datta jadhav
error: Content is protected !!