तरुण भारत

देवचंदच्या माजी उपप्राचार्य गौरवती भोसले-खराडे यांचे निधन

निपाणी : देवचंद ज्यु कॉलेजच्या माजी उपप्राचार्या व थोर समाजसेविका , कवियत्री गौरवती प्रताप भोसले (खराडे) मॅडम यांचे वयाच्या साठाव्या वर्षी आज कोल्हापूर येथे निधन झाले. खराडे मॅडम या अर्थशास्त्र विभागातून पदवीधर झाल्या होत्या. त्या वक्तृत्व कलेत निपुण होत्या. सामान्य कुटुंबातून शिक्षण घेत त्यांनी वक्तृत्व कलेच्या जोरावर देवचंद कॉलेजमधून एम ए करून त्याच देवचंद कॉलेजच्या अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका म्हणून आपल्या सेवेची सुरुवात करून कर्तृत्वाचा ठसा उमटवला होता.
शैक्षणिक गुणवत्ते बरोबरच समाजहिताच्या दृष्टीने त्यांचे कार्य अलौकिक होते. त्यांना जिल्हा व राज्य पातळीवरील असंख्य पारितोषिके मिळाली होती .स्त्री अभ्यास केंद्र कोल्हापूर मार्फत आयोजित चर्चासत्रात त्यांनी सहभाग घेतला होता त्यांनी “स्त्री जन्मा तुझी कहाणी” हे पथनाट्य देखील लिहिले.शेतकरी कामगारासाठी लढणारे कॉम्रेड प्रताप भोसले यांच्याशी विवाह करून त्या प्राध्यापक गौरवती प्रताप भोसले बनल्या. सुखी संसाराच्या वेलीला “प्रियतोष” रूपी सुंदर फुल उमलले. सुखाच्या संसाराला नियतीची नजर लागली व कॉम्रेड प्रताप भोसले यांच्या अपघाती निधनानंतर त्यांच्यावर संकटाचा पहाड कोसळला होता. खराडे मॅडम या नावा भोवती अनेक जीव एकवटलेले होते त्यांचा स्वभाव कणखर पण एकदम मनमिळावू, त्यांनी कधीही लहान-थोर गरीब-श्रीमंत असा भेदभाव केला नाही त्या महाविद्यालयांमध्ये अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका होत्या सन 2018 साली त्या सेवानिवृत्त झाल्या होत्या.
 

Related Stories

डॉ. रायमाने दांपत्यांकडून प्रियंका कांबळे यांचा सन्मान

Patil_p

कोनवाळ गल्ली नाला स्वच्छतेचे काम पुर्ण करण्याची मागणी

Patil_p

अपहरण करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Patil_p

पुणे-बेळगाव रेल्वे सेवा 9 फेब्रुवारीपासून

prashant_c

यंदा कोरोनाच्या संकटामुळे गोकुळ जन्माष्टमी साधेपणाने

Patil_p

धनादेशऐवजी आता मनपाच देणार लॅपटॉप

Patil_p
error: Content is protected !!