तरुण भारत

पुणे विभागातील 2 लाख 51 हजार 521 रुग्ण कोरोनामुक्त 

ऑनलाईन टीम / पुणे : 


पुणे विभागातील 2 लाख 51 हजार  521 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 36 हजार 395 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 76  हजार 141 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 8 हजार 733 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.60  टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 74.77 टक्के आहे, अशी माहिती  विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 

पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण  2 लाख  27 हजार 307 रुग्णांपैकी 1 लाख 81 हजार 315 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 40 हजार 881 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार  111 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  2.25 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 79.77 टक्के आहे. 

सातारा जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 24  हजार 578 रुग्णांपैकी 15 हजार 594  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 25 हजार 386  रुग्णांपैकी 17 हजार  601 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. 


आजपर्यत विभागामध्ये एकुण 14 लाख  89 हजार 506 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 3  लाख 36  हजार  395 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 

Related Stories

पुणे विभागात आतापर्यंत 79,312 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज

pradnya p

पुणे विभागात 28, 989 रुग्ण कोरोनामुक्त!

pradnya p

महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल 95.30 टक्के ; यावर्षीही मुलींचीच बाजी

pradnya p

प्रतिबंधित क्षेत्र व त्यालगतच्या पाचशे मीटर क्षेत्रातील सर्व प्रकारच्या अबकारी अनुज्ञप्त्या बंद

datta jadhav

एसटी कर्मचार्‍यांना २० दिवस सक्तीची रजा म्हणजे जिझीया कर

triratna

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परब्रम्ह गोपालनाथ महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव यावर्षी रद्द

pradnya p
error: Content is protected !!