तरुण भारत

देशातील 26 राज्यांच्या जीएसटी उत्पन्नात नोंदवली घसरण

वर्षाच्या तुलनेत जवळपास 25 टक्क्यांची घसरण

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

देशातील जवळपास 26 राज्यांतील आणि केंद्र शासित प्रदेशातील वस्तू आणि सेवा कराच्या (जीएसटी) उत्पन्नात एक वर्षाच्या तुलनेत जवळपास 25 टक्क्मयांची घसरण नोंदवण्यात आली आहे, अशी माहिती वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकुर यांनी दिली आहे.

कोरोना संकटाच्या कारणामुळे वित्त वर्ष 2019-20 च्या तुलनेत चालू वित्त वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यात या राज्याचे जीएसटी उत्पन्न जवळपास एक चतुर्थांशने घटले आहे. यामध्ये सर्वाधिक नुकसान मिझोरम आणि गोवा यांना झाल्याची माहिती आहे. कारण एका वर्षाच्या तुलनेत याचे उत्पन्न हे जवळपास 43 टक्क्मयांनी घसरले आहे. तसेच झारखंडचे या दरम्यान मागील वर्षाच्या बरोबरीत 10,091 कोटीच्या तुलनेत चालू वर्षात 5,967 कोटी आणि उत्तराखंडला मागील वर्षाच्या आकडेवारीत 6,327 कोटीच्या तुलनेत फक्त 3,760 कोटी रुपये मिळाले आहेत.

जवळपास 11 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधील उत्पन्नात घसरण होत  एप्रिल ते ऑगस्ट 2020 पर्यंत यात वाढ होत 30 ते 38 टक्क्मयांवर गेली आहे. तसेच 26 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील जीएसटी उत्पन्न चालू वित्त वर्षात पहिल्या पाच महिन्यात 29 टक्क्मयांनी घसरले आहे.

नुकसान भरुन काढण्याचा मार्ग

नुकत्याच झालेल्या 21 क्या जीएसटी परिषदेत काही पर्याय देण्यात आले आहेत. यामध्ये आपल्या जीएसटी नुकसानीतील भरपाई करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी 97,000 कोटी रुपये उधार घेणे किंवा संपूर्ण नुकसान 2.35 लाख कोटीपर्यंत उधार घेता येणार आहे. म्हणजे राज्यांना कमीत कमी व्याजदरावर उधार घेत आपले काम चालविण्याची सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती परिषदेत देण्यात आली.

Related Stories

10 हजारहून अधिक कंपन्या एप्रिल-फेब्रुदरम्यान झाल्या बंद

Patil_p

जेएसडब्ल्यू स्टीलने उत्पादन घटवले

Patil_p

स्पाइस एक्सप्रेसला लॉजिस्टिक व्यवसायात करणार हस्तांतरित

Amit Kulkarni

हय़ुंडाईची विक्री 70 टक्के घटली

Patil_p

वाहन उद्योगाच्या निर्यातीत 7 वर्षानंतर वाढ

Patil_p

दुसऱया दिवशी सेन्सेक्स 280 अंकांनी वधारला

Patil_p
error: Content is protected !!