तरुण भारत

दुसऱया दिवशी सेन्सेक्स 288 अंकांनी तेजीत

जागतिक वातावरणाचा प्रभाव : निफ्टी 11,500 च्या वर

वृत्तसंस्था / मुंबई 

Advertisements

जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे भारतीय बाजारांनी आज उत्साह दर्शवला. दिवसभरातील बँकींगच्या समभागातील विक्रीमुळे बीएसई सेन्सेक्स 288 अंकांनी मजबूत झाल्याचे पहावयास मिळाले आहे.

दिवसभरातील प्रमुख कामगिरीच्या जोरावर सरतेशेवटी सेन्सेक्स 287.72 अंकांनी मजबूत होत 39,044.35 वर बंद झाला. तसेच दुसऱया बाजूला निफ्टी 81.75 अंकांनी वधारुन 11,521.80 वर बंद झाला आहे.

प्रमुख कंपन्यांमध्ये इंडसइंड बँकेचे समभाग सर्वाधिक 4 टक्क्मयांनी नफ्यात राहिले आहेत. सोबत भारती एअरटेल, ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, बजाज फायनान्स, सन फार्मा आणि कोटक बँक यांचे समभाग तेजीत राहिले आहेत. दुसऱया बाजूला समभाग घसरणाऱया कंपन्यांमध्ये टायटन, मारुती, आयटीसी, एशियन पेन्ट्स, एचसीएल टेक आणि बजाज ऑटो यांचा समावेश आहे. शेअर बाजारात मंगळवारी सकाळी सुरूवातीला एचडीएफसी बँक, एचडीएफसी आणि रिलायन्स इंडस्ट्रिजच्या समभागांमुळे सेन्सेक्सने 200 अंकांच्या वाढीसह सुरूवात केली. दुपारी 12 वाजून 22 मिनीटांनी सेन्सेक्स 39 हजारावर आणि निफ्टी 11 हजार 500 वर पोहचला होता.

विदेशी भांडवलातील तेजी

प्रमुख व्यवहारांनंतर जागतिक बाजार मजबूत राहिल्याने विदेशी भांडवलात प्रवाह राहिल्याने देशातील बाजार तेजीत राहिले आहेत. यामध्ये शेअर बाजारातील उपलब्ध आकडेवारीनुसार विदेशी संस्थांकडून सोमवारी निक्वळ स्वरुपात 298.22 कोटी रुपयांच्या मूल्याची समभाग विक्री झाली आहे.

जागतिक पातळीवर प्रामुख्याने आशियातील अन्य बाजारात चीनमधील शांघाय, हाँगकाँग दक्षिण कोरियातील सोल हे लाभात राहिले आहेत. तर जपानचा टोकीओमधील बाजारात घसरण नोंदवण्यात आली आहे. यादरम्यान जागतिक तेल मानक ब्रेंट क्रूडचे भाव 1.49 टक्क्मयांनी मजबूत होत 40.20 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहेत. तसेच अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 16 पैशांनी घसरुन 73.64 वर बंद झाला आहे.

Related Stories

बाजारातील तेजीच्या प्रवासाला अखेर विराम

Patil_p

भारतीय अर्थव्यवस्था गतीमान होणार

Patil_p

आगामी टप्प्यातील विमानतळ खासगीकरण प्रक्रिया एप्रिलपासून

Patil_p

इपीएफओकडे जुलैमध्ये 8.45 लाख नवीन नावनोंदणी

Patil_p

दुसऱया दिवशीच्या सत्रात तेजीची झुळूक

Patil_p

आरबीआय निर्णयामुळे सेन्सेक्स नव्या उंचीवर

Patil_p
error: Content is protected !!