तरुण भारत

कोरोना रुग्णांची संख्या अडीच हजारावर

638 तपासणी अहवालांची प्रतीक्षा : आणखी 51 पॉझिटिव्ह, 47 जणांना डिस्चार्ज

  • आणखी एका रुग्णाचा मृत्यू, एकूण 46 जणांचा मृत्यू
  • एकूण 1 हजार 491 जण कोरोना मुक्त

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

जिल्हय़ात मंगळवारी आणखी 51 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या अडीच हजारावर गेली आहे. बरे झालेल्या आणखी 47 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर एकाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. दरम्यान गत दोन दिवसांत रुग्णसंख्या कमी झाली असली, तरी कोरोना नमुना तपासण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. तब्बल 638 कोरोना नमुने तपासणी करायचे आहेत, ही बाबही महत्वाची आहे.

जिल्हय़ात गेल्या पंधरा दिवसांत शंभरच्या पटीत कोरोना बाधित रुग्ण संख्या वाढत असताना गेल्या दोन दिवसात ती निम्म्यावर 50 पर्यंत आली आहे. असे असले, तरी कोरोना नमुने तपासणीचे काम धीम्या गतीने सुरू आहे. त्यामुळे कोरोना नमुने तपासणीच्या प्रतीक्षेत आहेत. चार-चार दिवसांचे अहवाल प्रलंबित आहेत. 638 नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत.

जिल्हय़ात नव्याने 51 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2 हजार 520 म्हणजेच अडीच हजारावर गेली आहे. तर बरे झालेल्या 47 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे एकूण 1 हजार 491 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्हय़ात सक्रिय 983 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मालवण येथील एका 68 वषीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 46 झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

तपासण्यात आलेले एकूण नमुने                                           20692

आतापर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह नमुने                                                2520

आतापर्यंतचे एकूण निगेटिव्ह नमुने                                      17534

अहवाल प्राप्त न झालेले नमुने                                              638

सद्यस्थितीत जिल्हय़ातील सक्रिय रुग्ण                                  983

मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या                                             46

डिस्चार्ज देण्यात आलेले रुग्ण                                              1491

गृह व शासकीय संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती                8345

नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती               12562

Related Stories

खेडमधून 190 मध्यप्रदेशातील मजूर पनवेलला रवाना

Patil_p

जिल्हय़ात कोरोनानंतर आता स्वाईन फ्लू

tarunbharat

प्रशासन, लोकप्रतिनिधींचे सिंधुदुर्गात काम सर्वोत्तम!

NIKHIL_N

रत्नागिरीत कोरोनाचे आणखीन तीन बळी

Shankar_P

मूर्तीची नको, भक्तीची उंची वाढवा!

NIKHIL_N

सीआरझेडच्या वावटळीत सापडला गुहागरचा पर्यटन विकास

Patil_p
error: Content is protected !!