तरुण भारत

कोल्हापूर जिल्ह्यात 24 तासात 1 हजार 76 कोरोनामुक्त, ‘कोरोना’चे 34 बळी

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्ह्यात मंगळवारी, गेल्या 24 तासांत कोरोनाने 34 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींची संख्या 1 हजार 124 झाली. तसेच आजपर्यंतचे सर्वाधिक असे 1 हजार 76 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सायंकाळपर्यत 519 नवे रूग्ण दिसून आले. त्यामुळे पॉझिटीव्ह रूग्णसंख्या 36 हजार 70 झाली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील यांनी मंगळवारी दिली.

Advertisements

जिल्ह्यात मंगळवारी सीपीआरसह अन्य केअर सेंटरमध्ये 1 हजार 443 जणांची तपासणी केली. त्यापैकी 1 हजार 398 जणांचे स्वॅब घेतले, 389 जणांची अँटीजेन टेस्ट केली. सध्या 11 हजार 257 रूग्ण उपचार घेत आहेत. सायंकाळपर्यंत शेंडा पार्क येथील लॅबमधून 2 हजार 497 रिपोर्ट आले. त्यापैकी 1 हजार 928 निगेटिव्ह तर 562 पॉझिटिव्ह आहेत. अँटीजेन टेस्टचे 389 रिपोर्ट आले. त्यापैकी 314 निगेटिव्ह तर 285 पॉझिटिव्ह आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

जिल्ह्यात कोरोनाने 34 जणांचा मृत्यू झाला. सीपीआर हॉस्पिटलमध्ये शिगाव सांगली येथील 74 वर्षीय पुरूष, सिद्धनेर्ली कागल येथील 50 वर्षीय पुरूष, घुणकी हातकणंगले येथील 60 वर्षीय पुरूष, आळते हातकणंगले येथील 60 वर्षीय पुरूष, कणेरीवाडी करवीर येथील 82 वर्षीय महिला, राजेंद्रनगर कोल्हापूर येथील 54 वर्षीय महिला आणि सावर्डे शाहूवाडी येथील 60 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

शहर, जिल्ह्यातील केअर सेंटर, खासगी हॉस्पिटल्समध्ये कागल येथील 49 वर्षीय पुरूष, जयसिंगपूर शिरोळ येथील 53 वर्षीय आणि 72 वर्षीय पुरूष, चिंचवाड करवीर येथील 49 वर्षीय पुरूष, रमणमळा न्यू पॅलेस येथील 62 वर्षीय पुरूष, माणगाव हातकणंगले येथील 80 वर्षीय महिला, सांगवडे करवीर येथील 69 वर्षीय पुरूष, इंगळी हातकणंगले येथील 40 वर्षीय पुरूष, पाटणे शाहूवाडी येथील 80 वर्षीय पुरूष, कळे पन्हाळा येथील 62 वर्षीय महिला, शाहूनगर कोल्हापूर येथील 49 वर्षीय पुरूष, पट्टणकोडोली हातकणंगले येथील 40 वर्षीय पुरूष, कुरणी चंदगड येथील 61 वर्षीय पुरूष, लक्कीकट्टी चंदगड येथील 65 वर्षीय पुरूष, बारडवाडी राधानगरी येथील 60 वर्षीय पुरूष, नवे पारगाव हातकणंगले येथील 70 वर्षीय पुरूष, शिरोळ येथील 70 वर्षीय महिला, पन्हाळा येथील 60 वर्षीय पुरूष, मोरेवाडी करवीर येथील 70 वर्षीय पुरूष, कळंबा करवीर येथील 69 वर्षीय महिला, हुपरी हातकणंगले येथील 86 वर्षीय पुरूष आणि शृंगारवाडी आजरा येथील 75 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला. कोरोनाने आजपर्यंत 1 हजार 90 जणांचा बळी घेतला आहे. जिल्ह्यात 462 जण कोरोनामुक्त झाल्याने आजपर्यत 23 हजार 206 जण कोरोनामुक्त झाले. सध्या 11 हजार 257 रूग्ण उपचार घेत आहेत.

शहरात गेल्या 24 तासांत 267 नवे रूग्ण दिसून आल्याने पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 11 हजार 282 झाली आहे. कोरोना बळींमध्ये ग्रामीण भागात 476, नगरपालिका क्षेत्रात 281, महापालिका क्षेत्रात 273 तर अन्य 59 अशा 1090 जणांचा समावेश आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत आजरा 24, भुदरगड 55, चंदगड 25, गडहिंग्लज 20, गगनबावडा 2, हातकणंगले 76, कागल 45, करवीर 125, पन्हाळा 57, राधानगरी 29, शाहूवाडी 48, शिरोळ 30, नगरपालिका क्षेत्रात 81, कोल्हापूर शहर 267 आणि अन्य 38 असे 922 रूग्ण दिसून आले.

Related Stories

आमदार रवी राणा यांची जीभ घसरली, मुख्यमंत्र्यांवर केली अक्षेपार्ह टीका

Rohan_P

वाईचा ब्रिटिश कालीन कृष्णापूल होणार नामशेष, नविन पुलास मंजुरी – आमदार पाटील

Abhijeet Shinde

नुकसानीचे पंचनामे तात्काळ पाठवा – मुख्यमंत्री

Abhijeet Shinde

कोरोना संपला नाही काळजी घ्या

Patil_p

तडवळेत शेतजमिनीच्या कारणावरून मारामारी

Patil_p

कोल्हापुरात 1 किलो हस्तीदंतासह कार जप्त, तिघांना अटक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!