तरुण भारत

सांगली जिल्हय़ात 1019 रूग्ण कोरोनामुक्त

प्रतिनिधी / सांगली

मंगळवारी जिल्हय़ात नवीन 749 रूग्ण वाढले आहेत. तर विक्रमी 1019 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. उपचार सुरू असताना 40 जणांचे मृत्यू झाले आहेत. त्यामध्ये जिल्हय़ातील 38 आणि परजिल्हय़ातील दोघांचा समावेश आहे. एकूण जिल्हय़ात 931 जणांचा आजअखेर कोरोनाने बळी गेला आहे. तर आजअखेर कोरोनावर यशस्वी मात केलेल्या रूग्णांची संख्या 14 हजार 824 झाली आहे.

Advertisements

महापालिका क्षेत्रात 212 रूग्ण वाढले

महापालिका क्षेत्रात मंगळवारी नवीन रूग्ण मोठय़ासंख्येने वाढले आहेत. त्यामुळे महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मनपा क्षेत्रात 212 रूग्ण वाढले आहेत. त्यामध्ये सांगली शहरात 140 तर मिरज शहरात 72 रूग्ण वाढले आहेत. महापालिका क्षेत्रात आता घर टू घर सर्व्हे सुरू करण्यात आला आहे. तसेच ज्यांना त्रास होत आहे. त्यांची तपासणीही सुरू करण्यात आल्याने ही रूग्णसंख्या वाढतच चालली आहे. महापालिका क्षेत्रात आजअखेर एकूण रूग्णसंख्या 10 हजार 836 झाली आहे.

ग्रामीण भागात 537 रूग्ण वाढले

मंगळवारी ग्रामीण भागात 537 नवे रूग्ण आढळून आले आहेत. ग्रामीण भागात मोठय़ा संख्येने रॅपीड ऍण्टीजन टेस्ट सुरू केल्याने ही रूग्णसंख्या वाढत चालली आहे. तालुकानिहाय वाढलेली रूग्णसंख्या अशी, आटपाडी तालुक्यात 38, जत तालुक्यात 28, कडेगाव तालुक्यात 36 नवीन रूग्ण वाढले आहेत. कवठेमहांकाळ तालुक्यात 46, खानापूर तालुक्यात 43, मिरज तालुक्यात 61 रूग्ण वाढले आहेत. पलूस तालुक्यात 48, शिराळा तालुक्यात 37, तासगाव तालुक्यात 31 आणि वाळवा तालुक्यात विक्रमी 169 रूग्ण वाढले आहेत.

जिल्हय़ातील 38 जणांचा मृत्यू

जिल्हय़ातील 38 जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. यामध्ये  सांगली शहरातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मिरज शहरातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे.  जत तालुक्यातील एकाचा,  कडेगाव तालुक्यातील दोघा व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील एक, खानापूर तालुक्यातील चार आणि मिरज ग्रामीण भागातील पाच जणांचा मृत्यू झाला. पलूस तालुक्यातील सहा जणांचा, तासगाव तालुक्यातील दोघांचा, शिराळा तालुक्यातील  पाच जणांचा आणि  वाळवा तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे. जिल्हय़ातील एकूण 38 जणांचा मंगळवारी मृत्यू झाला आहे. आजअखेर 931 जणांचे मृत्यू झाले आहेत.

परजिल्हय़ातील दोघांचा मृत्यू

 परजिल्हय़ातील उपचार सुरू असणाऱया एकाचा मृत्यू झाला आहे.  सातारा जिल्हय़ातील पाटण येथील 86 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालय येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर  कोल्हापूर जिल्हय़ातील चंदगड येथील 65 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रूग्णालयात मृत्यू झाला. आजअखेर परजिल्हय़ातील 139 जणांचे कोरोनाने बळी गेले आहेत.

विक्रमी 1019 जण कोरोनामुक्त

जिल्हय़ात मंगळवारी विक्रमी 1019 रूग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. गेल्या साडेपाच महिन्यात प्रथमच एकाचवेळी एक हजारापेक्षा अधिक रूग्ण बरे झाले आहेत. तसेच वाढलेली रूग्णसंख्येपेक्षा कोरोनामुक्त रूग्णसंख्या मोठी झाली आहे. आजअखेर  14 हजार 824 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

2616 जणांचे स्वॅब तपासले

जिल्हय़ात मंगळवारी दोन हजार 616 जणांचे स्वॅब तपासले आहेत. यामध्ये आरटीपीसी मधील 607 स्वॅब तपासणी केली तर रॅपीड ऍण्टीजन टेस्टमध्ये दोन हजार नऊ जणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये नवीन 749 रूग्ण आढळून आले आहेत.

कोरोनाची जिल्हय़ातील स्थिती

एकूण रूग्ण    24788

बरे झालेले     14824

उपचारात      9033

मयत          931

Related Stories

सांगली : १५४ नवे रुग्ण तर २२५ जण कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

सांगली : जत येथे सव्वा चार लाखांचा गुटखा जप्त

Abhijeet Shinde

सांगली : खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांनी लक्षणे असणाऱ्यांची माहिती आरोग्य यंत्रणेला देणे आवश्यक : जिल्हाधिकारी

Abhijeet Shinde

सांगली : दिवाळीपूर्वी मंदिरे व प्रार्थनास्थळे सुरु करा

Abhijeet Shinde

वाळव्यात तरुणावर खुनी हल्ला

Abhijeet Shinde

सांगली : यार्डातील हळद हंगाम अर्ध्यावर!

Abhijeet Shinde
error: Content is protected !!