तरुण भारत

आठवडय़ाचा शुक्रवार बाजार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय

प्रतिनिधी

म्हापसा

म्हापसा बाजारपेठेतील विक्रेते, व्यापारी संघटना व पालिका मुख्याधिकारी कबीर शिरगांवकर यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त बैठक मंगळवारी सकाळी पार पडली. बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यात प्रामुख्याने आठवडय़ाचा शुक्रवार बाजार पुन्हा सुरू करण्याबाबतही चर्चा झाली. सोशल डिस्टन्सी व सेनिटायझरचा विपर करून शुक्रवारचा बाजार पुन्हा सुरू करावा अशी एकच मागणी सर्वांनी केली. दरम्यान बाजारपेठेतील कोणकोण विक्रेते आहेत यांची एक यादी तयार करून त्यांना बाजारपेठेत बसण्यासाठी ओळखपत्र देण्याबाबतही निर्णय झाला. हे करीत असताना नेमके कोण व्हेंडर आणि कोण विक्रेते यावर सल्ला घेण्यासाठी कायदे पंडिताचा आधार घ्यावा असे ठरविण्यात आले.  

यावेळी पालिका लेखापाल भानुदास नाईक, नगरसेवक संदीप फळारी, म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आशिष शिरोडकर, विक्रेते प्रतिनिधी प्रवीण वेंगुर्लेकर, म्हापसा ट्राफिक पोलीस निरीक्षक तुषार वेर्णेकर आदी उपस्थित होते.

कोण विक्रेते आणि कोण नाही या निर्णयसाठी कायदे पंडितांचा सल्ला घेणार

म्हापसा पालिकेचे मुख्याधिकारी कबीर शिरगावकर म्हणाले की, म्हापसा पालिकेचे बाजारपेठेबाबत घटनाक्रम लिहावी तसेच बाजारपेठेत जे कुणी विक्रेते आहेत त्यांची ओळख पटवून देण्यासाठी त्यांना ओळखपत्र द्यावी मात्र कोण विक्रेते आणि कोण नाही हा प्रश्न निर्माण झाल्याचे ते म्हणाले. यावर सल्ला घेण्यासाठी हा निर्णय कायदे पंडिताकडे पाठविण्यात येणार आहे. शिवाय व्हेंडींग झोन करण्याबाबतही निर्णय झाल्याची माहिती मुख्याधिकाऱयांनी यावेळी दिली. याबाबत पुढील चर्चा करण्यासाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात बैठक बोलावली असल्याचे ते म्हणाले.

बाजारपेठेत 1200 च्या आसपास विक्रेते आहेत मात्र यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल. व्हेंडरखाली कोणकोण येतात याचाही तपशील घेण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पालिकेचा घटनाक्रम लिहिण्याबाबतही चर्चा करण्यात आल्याची माहितीही यावेळी मुख्याधिकाऱयांनी दिली. दरम्यान शुक्रवारचा आठवडा बाजार सुरू करण्याबाबतही चर्चा झाल्याचे ते म्हणाले.

विक्रेत्यांना ओळखपत्र देण्याबाबत निर्णय- आशिष शिरोडकर

म्हापसा व्यापाऱयांच्यावतीने टाऊन व्हेंडींग कमिटी नेमण्याच्या मागणीसाठी बैठक झाली. 2014 मध्ये यादी काढली होती त्यात 608 विक्रेते होते. त्यात भाजी व फळे विक्रेते त्यांना आयकार्ड ओळखपत्र द्यावे असा निर्णय झाला मात्र नगरसेवक संदीप फळारी यांनी भाजी विक्रेते आहेत त्यातील काही व्हेंडर विक्रेत्यांमध्ये येत नाही असा आक्षेप घेतल्याने तो कितपत धरावे याबाबत चर्चा झाली. कायद्याप्रमाणे काय होते यावर चर्चा न्हायला पाहिजे. व्हेंडर कायद्यानुसार त्यांना दरदिवशी पैसे कमायला पाहिजे त्यांना टॉटलेट आदी सुविधा द्यावे. भाजी व मासळी कमिटी हे व्हेंडर की स्ट्रीट याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे मासळी माके4ट व भाजी मार्केट प्रत्येकी मासळी मार्केट व्हेंडींग कमिटी व भाजी मार्केट व्हेंडींग कमिटी व्हायला पाहिजे अशी मागणी म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आशिष शिरोडकर यांनी यावेळी केली. अन्यथा अन्य एक दोन मार्केट बांधून द्यावी लागेल. व्हेंडरसाठी कायमस्वरुपी जागा सरकारने कायद्यानुसार दिलेली नाही. परत ही यादी करायला गेलो तर सर्व गोंधळ निर्माण होईल. असे ते म्हणाले.

अन्य काही भाजी फळे आदी विक्री करतात त्यांना व्हेंडींग समितीत सामावून घ्यावे असे ते म्हणाले. अन्य काही विक्रेत्यांना बाजारपेठेत सामावून घेण्यात येणार आहे असेही ते म्हणाले. म्हापसा बाजारपेठेत जे विक्रेते आहेत त्यांची शहानिशा करून त्यांना ओळखपत्र दिली जाईल. कायद्याप्रमाणे सर्व सोयी यासाठी तपासल्या जाईल असे ठरविण्यात आले आहे. शुक्रवारचा बाजार सोशल डिस्टन्सी ठेवून सुरु करावा अशी मागणी केली.

सर्वांना बाजारपेठेत सामावून घ्या- वेंगुर्लेकर

विक्रेत्यांचे प्रतिनिधीत्व करणारे प्रवीण वेंगुर्लेकर यावेळी म्हणाले की, बाजारपेठेत कसे बसायचे याबाबत चर्चा झाली. एक तृतीयांश प्रमाणे आम्ही बाजारपेठेत बसतो अशी मागणी आम्ही केल्याचे त्यांनी सांगितले. मासळी, फुले वाल्यांना कायमस्वरुपी शेड दिली तशी आम्हाला बाजारपेठेत सर्वांना बसायला द्यावे असे ते म्हणाले.

Related Stories

कोकणी-हिंदी राष्ट्रीय परिसंवादाला फर्मागुडीत प्रारंभ

Patil_p

शिथीलतेमुळे जनजीवन येतेय पूर्वपदावर

omkar B

प्रश्नपत्रिकेतील हा प्रश्न सरकारचे पितळ उघडे पाडणारा

omkar B

न्हावेली साखळीतील खुनप्रकरणी चुलत भवासह तीन जणांना अटक

Patil_p

मंगळवारी नवे 45 कोरोना बाधित

omkar B

गौरव आर्य आज ‘इडी’समोर हजर राहणार

Patil_p
error: Content is protected !!