तरुण भारत

डॉ. विशाल च्यारीची आत्महत्त्या नव्हे घातपात

प्रतिनिधी / मडगाव :

गोवा विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाचे सहाय्यक प्रोफेसर डॉ. विशाल च्यारी याचा मृतदेह चंद्रेश्वर भूतनाथ पर्वतावरील जंगल भागात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यावेळी केपे पोलिसांनी हे प्रकरण आत्महत्तेचे असल्याचे म्हटले होते. मात्र, काल विशालच्या आईने केपे पोलीस स्थानकात आपल्या मुलाने आत्महत्या केली नसून त्याचा घातपात केल्याचा संशय व्यक्त केला आहे.

डॉ. विशाल च्यारी हे गणेश चतुर्थीनंतर बेपत्ता झाले होते. त्यानंतर त्याची कार पर्वत-पारोडा येथे आढळून आली होती. ते बेपत्ता झाल्यानंतर तब्बल तेरा दिवसांनी त्याचा अत्यंत सडलेल्या अवस्थेत चंद्रेश्वर भूतनाथ पर्वतावरील जंगल भागात आढळून आला होता. त्याच्या कारमध्ये एक लॅपटॉप तसेच मोबाईलही पोलिसांना सापडला होता.

काल मंगळवारी मयत डॉ. विशाल च्यारी याची आई श्रीमती सुगंधा च्यारी व मोठा भाऊ हरिष च्यारी यांनी केपे पोलीस स्थानकात लेखी तक्रार सादर केली असून या तक्रारीत आपल्या मुलांने आत्महत्या केलेली नाही तर कुणी तरी त्याचा घातपात केल्याचा संशय व्यक्त केला आहे. हे प्रकरण खून म्हणून पहावे अशी विनंती देखील केली आहे.

मयत डॉ. विशाल च्यारी व त्याच्या बायकोमध्ये वाद निर्माण झाला होता व त्याचे एकमेकांशी पटत नव्हते असा दावा आई सुगंधा च्यारी हिने प्रसार माध्यमांशी बोलताना केला. रक्षाबंधनाच्या दिवशी डॉ. विशाल च्यारी याने आपल्या बहिणीला आपण आत्महत्या करणार नसल्याचे सांगितले होते. आपण ऐवढे शिक्षण घेऊन काय उपोय असे ही तो म्हणाला होता, याच मुद्दावरून आम्ही केपे पोलीस स्थानकात विशालची आत्महत्या नव्हे तर घातपात असा संशय व्यक्त करणारी तक्रार नोंद केल्याची माहिती हरिष च्यारी यांनी दिली आहे.

29 ऑगस्ट रोजी डॉ. विशाल च्यारी जेव्हा बेपत्ता झाले, त्या दिवशी त्याच्या पत्नीने आमची दिशाभूल केल्याचा दावाही हरिष याने केला. या दिवशी त्याच्या पत्नीने थेट आमच्याशी संपर्क न साधता इतरांमार्फत संपर्क साधला तसेच दुसऱया दिवशी पहाटे फोन करून त्याच्या बायकोने घुडो-अवडे येथील श्री शांतादुर्गा चामुडेश्वरी देवस्थान परिसरात तसेच चंद्रेश्वर-भूतनाथ पर्वतावर शोध का घेत नाही अशी विचारणा केली. डॉ. विशालची गाडी पर्वताच्या पायथ्याशी आहे हे तिला कसे काय समजले असा सवालही भाऊने उपस्थितीत केला आहे.

आम्हाला या प्रकरणात न्याय पाहिजे अशी मागणी त्यांनी केपे पोलिसांकडे केली आहे. जर आत्महत्या केली असेल तर ती का ? करण्यात आली व त्याला कुणी प्रवृत्त केले याचा तपास करावा अशी मागणी देखील हरिष च्यारी याने केली आहे.

मात्र, केपे पोलिसांकडे संपर्क साधला असता, त्यांनी हे प्रकरण आत्महत्तेच असून डॉ. विशाल च्यारी याला आपली बायको तसेच आपले कुटुंब यांच्यातील समतोल साधण्यात अयशस्वी ठरला होता. त्याने मानसिक दडपणाखाली येऊन ही टोकाची भूमिका घेतल्याचे सांगितले. जर डॉ. विशालच्या कुटुंबियांकडे काही ठोस पुरावे असेल तर ते पोलिसांना सादर करावे, पोलीस नक्कीच त्या दृष्टीकोनातून तपास करतील असे सांगण्यात आले.

Related Stories

हॉटेल, रेस्टॉरंट, बार सुरु करण्यास मान्यता द्यावी

Patil_p

साडेसहा लाखांच्या दागिने चोरीप्रकरणी महिलेला अटक

omkar B

कंत्राटी कामगारांची सरकारी सेवेत पूर्ण वेळ घेण्याची मंत्री मायकल लोबोकडे मागणी

Patil_p

वाघाच्या नखांचा शोध घेण्याचे वनखात्याच्या तपासणी यंत्रणा समोर आव्हान.

Patil_p

परीक्षा रद्दच करा, अन्यथा शाळेतच त्वरित घ्या

omkar B

कोरोनाबाधितांची संख्या 706 वर

Patil_p
error: Content is protected !!