तरुण भारत

थॉमस-उबेर चषक स्पर्धा वर्षासाठी लांबणीवर

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

डेन्मार्कमध्ये नियोजित असलेली थॉमस व उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धा एका वर्षाने लांबणीवर टाकण्यात आली आहे. कोरोना महामारीच्या वाढत्या प्रकोपामुळे अनेक अव्वल संघांनी या स्पर्धेतून माघार घेतल्याने विश्व बॅडमिंटन फेडरेशनने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

आरहस, डेन्मार्क येथे ही स्पर्धा 3 ते 11 ऑक्टोबर या कालावधीत होणार होती आणि या स्पर्धेसाठी भारताने आपला पुरुष व महिला संघही घोषित केला होता. कोरोनाच्या भीतीने थायलंड, ऑस्ट्रेलिया, चिनी तैपेई, अल्जेरिया यांनी याआधीच माघार घेतली होती. गेल्या शुक्रवारी इंडोनेशिया व दक्षिण कोरिया यांनीही माघार घेतल्यानंतर बीडब्ल्यूएफने तातडीने कौन्सिलची आभासी बैठक रविवारी घेतली. ‘आयोजक बॅडमिंटन डेन्मार्कशी सविस्तर चर्चा केल्यानंतर पूर्ण सहमतीने ही स्पर्धा पूर्णांशाने पुढील वर्षापर्यंत लांबणीवर टाकण्याचा कठीण निर्णय घेतला आहे,’ असे बीडब्ल्यूएफने सांगितले. ‘अनेक संघांनी या थॉमस-उबेर चषक आणि युरोपमध्ये सुधारित वेळापत्रकानुसार घेण्यात येणाऱया बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर हा निर्णय घ्यावा लागला आहे. आता पुरुष व महिलांची विश्व सांघिक चॅम्पियनशिप स्पर्धेच्या आयोजनासाठी आम्ही नवीन तारीख शोधण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण 2021 च्या आधी ही स्पर्धा होण्याची शक्यता नाही,’ असेही त्यांनी म्हटले आहे.

बीएफडब्ल्यूने सिंगापूर व हाँगकाँग यांना बदली संघ म्हणून आणण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी ते निमंत्रण स्वीकारले नाही. जपाननेही या स्पर्धेतून माघार घेण्याचा विचार चालविला असल्याचे वृत्त होते तर चीन देखील सरकारची मंजुरी मिळण्याच्या प्रतीक्षेत होते. 18 सप्टेंबर ही प्रवेश निश्चित करण्याची अंतिम तारीख होती. खेळाडूंमध्ये भारताच्या सायना नेहवालने महामारीच्या काळात स्पर्धा आयोजित करण्याबाबत चिंता व्यक्त केली होती. भारताने संघ जाहीर केले असले
तरी सराव शिबिर रद्द झाल्याने त्यांची अपेक्षित तयारी होऊ शकली नव्हती.

Related Stories

राष्ट्रीय पुरस्कार निवड समितीत सेहवाग, सरदार सिंग

Patil_p

महिला टेनिसपटूंच्या मानांकनात बार्टी आघाडीवर

Patil_p

अर्सेनलकडे एफए फुटबॉल चषक

Patil_p

कोरोनाग्रस्तांसाठी बॅलेचा मदतीचा हात

Patil_p

लंडन डायमंड लीग स्पर्धा रद्द

Patil_p

भारताचे माजी बॉक्सर डिंको सिंग यांना कोरोनाची बाधा

pradnya p
error: Content is protected !!