तरुण भारत

प्रिमियर लीगमधील चार फुटबॉलपटू कोरोना बाधित

लंडन : येथे सुरू असलेल्या प्रिमियर लीग फुटबॉल स्पर्धेतील चार फुटबॉलपटूंना कोरोनाची लागण झाल्याची माहिती सोमवारी स्पर्धा आयोजकांनी दिली आहे.

सदर स्पर्धा गेल्या आठवडय़ात सुरू झाली. या स्पर्धेतील सामने बंदिस्त स्टेडियममध्ये प्रेक्षकविना खेळविले गेले. या सामन्यावेळी कोरोना प्रतिबंधक नियमांची अंमलबजावणी करण्यात आली होती. सदर स्पर्धेमध्ये सहभागी झालेले 2131 फुटबॉलपटू तसेच विविध क्लबच्या प्रशिक्षक वर्गाची कोरोना चांचणी 7 ते 13 सप्टेंबर दरम्यान घेतली गेली. या चांचणीमध्ये नव्याने चार फुटबॉलपटूंना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत कोरोनाच्या 1605 चांचण्या घेण्यात आल्या असून त्यामध्ये तीन व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळले. कोरोना बाधित फुटबॉलपटूंना 10 दिवसांच्या कालावधीसाठी सेल्फ आयसोलेशनमध्ये राहण्याचा आदेश देण्यात आला आहे.

Related Stories

गंभीरने केले मोलकरणीचे अंत्यसंस्कार

Patil_p

किर्गिओस, हॅलेप, नदाल दुसऱया फेरीत

Patil_p

मास्टर ब्लास्टर सचिनकडून खास फोटो शेअर करत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा !

pradnya p

टी-20 वर्ल्डकप स्पर्धा न्यूझीलंडमध्ये घ्यावी

Patil_p

अश्विन पुढील सामन्यासाठी उपलब्ध, पण…

Patil_p

करुण नायर विवाहबद्ध

Patil_p
error: Content is protected !!