तरुण भारत

निशीकोरी, डिमिट्रोव्ह, सिलीक दुसऱया फेरीत

रोम : सोमवारपासून येथे सुरू झालेल्या एटीपी टूरवरील इटालियन खुल्या पुरूषांच्या क्ले कोर्ट टेनिस स्पर्धेत जपानचा निशीकोरी, बल्गेरियाचा डिमिट्रोव्ह आणि क्रोएशियाचा सिलीक यांनी एकेरीत विजयी सलामी दिली. चालू वर्षांतील निशीकोरीचा हा पहिला विजय आहे.

जपानच्या निशीकोरीने पहिल्या फेरीतील सामन्यात तब्बल दोन तासांच्या कालावधीत स्पेनच्या व्हिनोलासचा 6-4, 7-6 (7-3)
असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. बल्गेरियाच्या 15 व्या मानांकित डिमिट्रोव्हने इटलीच्या वाईल्ड कार्डधारक मॅगेरचा 7-5, 6-1 तसेच सिलीकने कझाकस्तानच्या बुबलीकचा 6-7 (4-7), 6-2, 6-4 असा पराभव करत विजयी सलामी दिली. इटलीच्या सिनेरने फ्रान्सच्या पेरीचा 6-2, 6-1, कोरिकने गॅरीनचा 6-4, 6-4, फ्रान्सच्या हंबर्टने अँडरसनचा 6-3, 7-6 (7-5) असा पराभव केला.

महिलांत मर्टन्सने विजयी सलामी देताना तैवानच्या वेईचा 6-3, 6-1, इटलीच्या पाओलीनीने लॅटव्हियाच्या सेव्हास्टोव्हाचा 6-2, 6-3, झेकच्या स्ट्रायकोव्हाने रशियाच्या कुडेरमेटोव्हाचा 6-3, 6-3 असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.

करत दुसऱया फेरीत प्रवेश मिळविला.

Related Stories

अमेरिकेची सोफिया केनिन नवी सम्राज्ञी

Patil_p

वॉर्नने निवडलेल्या भारतीय संघाचा गांगुली कर्णधार

Patil_p

पाक हॉकीपटूंकडून किमती वस्तूंचे स्मगलिंग : हनिफ खान

Patil_p

पुढील वर्षी भारतात पहिले सायकलिंग समिट

Patil_p

मायकल क्लार्क ऑस्ट्रेलियाचा ‘ऑफिसर ईन ऑर्डर’

Patil_p

ज्येष्ठ क्रिकेटपटु बाबू खानापूरकर यांचे दुःखद निधन

Rohan_P
error: Content is protected !!