तरुण भारत

भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 50 लाखांचा टप्पा

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येने 50 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशात मागील 24 तासात 90 हजार 123 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1290 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 50 लाख 20 हजार 360 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 82 हजार 066 एवढी आहे. 

सध्या देशात 9 लाख 95 हजार 933 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 39 लाख 42 हजार 261 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

आतापर्यंत देशात 5 कोटी 94 लाख 29 हजार 115 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 11 लाख 16 हजार 842 रुग्णांची तपासणी मंगळवारी एका दिवसात करण्यात आली.

Related Stories

मध्य प्रदेश : मंत्री अरविंद भदौरिया यांना कोरोनाची बाधा

pradnya p

वाराणसी : डिझेल रेल्वे इंजिन कारखान्याला आग

pradnya p

मुंबईत अत्यावश्यक सेवांसाठी आजपासून लोकल सेवा सुरू

pradnya p

देशात 48 हजार 916 नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

श्रीनगरमधील चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav

रूग्णाच्या डिस्चार्ज नियमावलीत बदल

Patil_p
error: Content is protected !!