तरुण भारत

रॉकेट लाँचिंगसाठी चीनने बनवले तरंगणारे स्पेसपोर्ट

ऑनलाईन टीम / बीजिंग : 

चीनने रॉकेट लाँचिंगसाठी तरंगणारे स्पेसपोर्ट बनवले आहे. या स्पेसपोर्टला ईस्ट एअरोस्पेस पोर्ट असे नाव देण्यात आले आहे. 

चीन एअरोस्पेस सायन्स अँड टेक्नोलॉजी कॉर्पने तयार केलेल्या या स्पेसपोर्टद्वारे चीन प्रशांत महासागरातून रॉकेट लाँच करू शकतो. ज्यामुळे सेटेलाईट्सला अंतराळात कमी वेळेत पोहचवता येईल. स्पेसपोर्टवरून चीनला छोटे रॉकेट, हलके अंतराळ वाहन, सेटेलाईट्स आणि अन्य अंतराळ तंत्रज्ञानांचे लाँचिंग व परीक्षण करता येणार आहे. 

नुकतेच चीनने या स्पेसपोर्ट्सवर लाँग मार्च – 11 हे रॉकेट लाँच केले. यात 9 सॅटेलाईट्स होते. हे लाँचपँडचे एक परीक्षण होते, जे यशस्वीरित्या पार पडले. दरम्यान, तरंगणाऱ्या लाँचपॅडवरून स्टारशिपला लाँच करण्याची घोषणा अमेरिकन स्पेस टेक्नोलॉजी कंपनी स्पेस एक्सने देखील केली होती. मात्र, त्यांना अद्याप ते शक्य झाले नाही.

Related Stories

एम्समधील डॉक्टरला कोरोनाची लागण

Patil_p

‘एस-400’चे क्षेपणास्त्र लक्ष्य हुकून कोसळल्याचा व्हिडीओ

Patil_p

मुख्यमंत्र्यांपाठोपाठ आता शरद पवार, अनिल देशमुख यांना धमक्यांचे फोन

pradnya p

अधिकाऱ्याची हत्या करून BSF जवानाची आत्महत्या

datta jadhav

मॉरिशसमध्ये भारतीय कॅप्टन अटकेत

Patil_p

किम जोंग उन यांच्या प्रकृतीबाबत उत्तर कोरियाने केला खुलासा…

prashant_c
error: Content is protected !!