तरुण भारत

भारतातील 1600 हून अधिक कंपन्यांमध्ये चीनची गुंतवणूक

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

चीनने एप्रिल 1016 ते मार्च 2020 या कालावधीत  1600 हून अधिक भारतीय कंपन्यांमध्ये 102 कोटी 2.5 लाख डॉलर्स म्हणजेच सात हजार कोटींहून अधिक रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक एफडीआयच्या माध्यमातून करण्यात आल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे.

भारतीय कंपन्यांमध्ये विशेषतः स्टार्टअप कंपन्यांमध्ये चीन सरकार मोठी गुंतवणूक करत आहे का, असा प्रश्न राज्यसभेत सरकारला विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाला केंद्र सरकारने लेखी उत्तर दिले आहे. त्यामध्ये सरकारने म्हटले आहे की, चीनने 46 वेगवेगळ्या क्षेत्रातील 1600 हून अधिक कंपन्यांमध्ये एफडीआयच्या माध्यमातून गुंतवणूक केली आहे. 

एप्रिल 1016 ते मार्च 2020 या चार वर्षांच्या कालावधीत चीनने भारतातील वाहन उद्योगात 17.2 तर सेवा क्षेत्रात 13 लाख 96 लाख 50 हजार कोटी  डॉलरची गुंतवणूक केली आहे. उर्वरीत गुंतवणूक चीनने पुस्तक छापाई, इलेक्ट्रॉनिक्स, वीज यासारख्या उद्योगात केली आहे. 

Related Stories

पाकचा नवीन नकाशा; काश्मीर, जुनागढवर ठोकला दावा

datta jadhav

नेपाळच्या भूमीवर कब्जा, चीनला तीव्र विरोध ‘गो बॅक चायना’च्या निदर्शकांकडून घोषणा

omkar B

लसीच्या मानवावरील चाचणीस प्रारंभ

Patil_p

अमेरिकेत 24 तासात 2228 कोरोना बळी

prashant_c

कोरोनाचा वर्णभेद : बिगरश्वेतवर्णीयांना अधिक धोका

Patil_p

…तरच निवडणुकीचा निकाल मान्य करणार

datta jadhav
error: Content is protected !!