तरुण भारत

दिल्लीतील भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता कोरोना पॉझिटिव्ह

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


दिल्लीतील भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. 


ते आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, मागील आठवड्यात ताप आला असल्यामुळे मी माझी कोरोनाची टेस्ट करून घेतली होती त्याचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. मात्र, त्यानंतर सतत अस्वस्थ वाटत असल्यामुळे मी पुन्हा एकदा कोरोना टेस्ट केली. त्यामध्ये माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. 


पुढे ते म्हणाले, तसेही मागील आठवड्यापासून मी क्वारंटाइनच आहे. तरी देखील कोणी माझ्या संपर्कात आले असेल तर त्यांनी आपली चाचणी करून घ्यावी, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले आहे. 


दरम्यान, भाजपच्या दिल्ली कार्यालयातील एकूण 17 जणांना आता पर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.    

Related Stories

दहशतवाद्यांच्या निशाण्यावर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे शहर; हाय अलर्ट जारी

pradnya p

चिंता वाढली : महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 7862 नवे कोरोना रुग्ण; 226 मृत्यू

pradnya p

जम्मू काश्मीरमध्ये 4 जी सेवा नाही

Patil_p

जम्मू काश्मीर : गुलमर्गमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

pradnya p

सरकार कडून ‘आरोग्य सेतू’ ॲप लॉन्च

prashant_c

रुग्णवाहिका सेवेचे वाजवी दर निश्चित करा

Patil_p
error: Content is protected !!