तरुण भारत

पेरूमध्ये कोरोनाबळींची संख्या 30 हजारांवर

ऑनलाईन टीम / प्रेटोरिया : 

दक्षिण अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीला लागून असलेल्या पेरू या देशात कोरोनाबळींच्या संख्येने 30 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. पेरूमध्ये आतापर्यंत 7 लाख 38 हजार 020 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामधील 30 हजार 927 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 

पेरूमध्ये बुधवारी 4 हजार 160 नवे कोरोना रुग्ण आढळून आले. तर 115 जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत 5 लाख 80 हजार 753 रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. 1 लाख 26 हजार 340 रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामधील 1460 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 

पेरू हा देश कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत जगात पाचव्या स्थानी आहे. पेरूमध्ये आतापर्यंत 34 लाख 67 हजार 927 नमुन्यांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णवाढीच्या संख्येत अमेरिका, भारत, ब्राझील आणि रशिया जगात आघाडीवर आहेत. त्यानंतर पेरूचा पाचवा नंबर लागतो. 

Related Stories

ब्राझीलमध्ये 24 तासात 55 हजार नवे कोरोना रुग्ण

datta jadhav

परदेशी पर्यटकांना कोरोना झाल्यास उज्बेकिस्तान देणार सव्वा दोन लाख रुपये

datta jadhav

‘ही’ आहेत कोरोनाची नवीन सहा लक्षणे

datta jadhav

अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक हॅकर्सच्या निशाण्यावर

datta jadhav

अमेरिकेच्या टेक्सास, फ्लोरिडात पुन्हा निर्बंध

datta jadhav

तहाव्वूर राणाचा जामीन अर्ज अमेरिकन न्यायालयाने फेटाळला

datta jadhav
error: Content is protected !!