तरुण भारत

मॉस्कोतील बैठकीपूर्वी पँगाँगमध्ये भारत-चीन सैन्यांकडून गोळीबार

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारत-चीनमध्ये सीमावादावरून निर्माण झालेला तणाव कमी करण्यावर रशियातील मॉस्कोमध्ये परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीदरम्यान भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात चर्चा झाली. 10 सप्टेंबरला ही बैठक झाली. या बैठकीपूर्वी दोन दिवस दोन्ही देशातील सैनिकांमध्ये पँगाँग सरोवराच्या उत्तरेकडील किनाऱ्याजवळ गोळीबाराची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

पूर्व लडाखमधील फिंगर 3 आणि फिंगर 4 क्षेत्रात रेजलाईनवर 8 सप्टेंबरला दोन्ही सैन्यांकडून 100 ते 200 राउंड फायर झाले. हा गोळीबार सैन्याने एकमेकांवर न करता हवेत केला. या फायरिंगसाठी एलएमजी आणि असॉल्ट रायफलींचा वापर झाल्याचे सांगण्यात येत आहे. 

चिनी सैनिकांना रोखण्यासाठी 7 सप्टेंबरलाही शेनपॉव डोंगर रांगात भारतीय सैन्याला हवेत गोळीबार करावा लागला होता. चिनी सैन्याचे घुसखोरचे सर्व डाव भारतीय सैन्याने उलथून लावले आहेत.

Related Stories

चीनमध्ये आढळले ब्यूबॉनिक प्लेगचे रुग्ण

datta jadhav

आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई रुग्णालयात दाखल

pradnya p

अनेक क्षेत्रांना लवकरच आर्थिक पॅकेज मिळणार

Patil_p

जन औषधी दिवस : महिलेच्या ‘त्या’ वक्तव्यानं मोदी झाले भावूक

tarunbharat

कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स नेमणार : अमित देशमुख

pradnya p

देशव्यापी टाळेबंदीमुळे 5 टक्के ट्रकच रस्त्यांवर

Patil_p
error: Content is protected !!