तरुण भारत

इस्त्राईल, यूएई, बहारिनमध्ये ऐतिहासिक शांती करार

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

इस्त्राईल, संयुक्त अरब अमिराती आणि बहारिनमध्ये ऐतिहासिक शांती करार झाला. अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये हा सोहळा पार पडला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी मिळाली. 

इस्त्राईलचे पंधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू, यूएईचे शेख खलीफा बिन जायद अल नाहयान आणि बहारिनचे शाह हमद बिन अल खलीफा शांतता करारासाठी अमेरिकेत आले होते. या देशांनी पूर्व वैमनस्य विसरून मैत्री करारावर स्वाक्षरी केल्या. यूएई आणि बहारिनने इस्त्राईलसोबत वेगवेगळा करार केला आहे. 

या ऐतिहासिक शांती करारामुळे इस्त्राईल, संयुक्त अरब अमिराती आणि बहारिनला एकमेकांच्या देशात आपला दुतावास ठेवता येणार आहे. या ऐतिहासिक करारात डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार आणि जावई जेरेड कुशनर यांनी महत्वाची भूमिका बजावली. तर येत्या काळात आणखी चार ते पाच अरब राष्ट्र इस्त्राईलसोबत शांती करार करतील,असे सूतोवाच डोनाल्ड ट्रम्प यांनी केले आहेत.

Related Stories

महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या 35 हजारांवर

datta jadhav

कंगनाला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ‘Y’ श्रेणीतील सुरक्षा

datta jadhav

चिंता वाढली : औरंगाबादमध्ये आज 202 नवे रुग्ण; आतापर्यंत 247 रुग्णांचा मृत्यू

pradnya p

फ्रान्समध्ये 11 मे पर्यंत लॉक डाऊन

prashant_c

पाटणामध्ये ट्रेनने कारला दिली धडक; एकाच परिवारातील तिघांचा मृत्यू

pradnya p

पाकिस्तानातील निर्बंध हटणार

Patil_p
error: Content is protected !!