तरुण भारत

बाबरी विध्वंस खटल्याचा निकाल 30 सप्टेंबरला

ऑनलाईन टीम / नवी लखनऊ : 

अयोध्येत 1992 मध्ये झालेल्या बाबरी मशिद विध्वंस प्रकरणी न्यायाधीश एस. के. यादव यांचे विशेष सीबीआय न्यायालय 30 सप्टेंबर रोजी निकाल देणार आहे. निकालाच्या दिवशी न्यायालयाने या प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्याचे आदेश दिले आहेत.

बाबरी मशिद विध्वंस प्रकरणात आरोपी असलेल्या 32 जणांनी आपले जबाब नोंदवले आहेत. या खटल्याची सुनावणी 31 ऑगस्टपर्यंत पूर्ण झाली असून, आता 30 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती, साध्वी रिटब्रा, राज्यसभेचे माजी खासदार विनय कटियार यांचा या प्रकरणातील मुख्य आरोपींमध्ये समावेश आहे. 

Related Stories

स्थलांतरितांच्या ‘तिकिटा’वरून काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली

Patil_p

वडिलोपार्जित मालमत्तेत मुलींना समान वाटा

Patil_p

राज्यसभा उपसभापतिपदी हरिवंश सिंह यांची फेरनिवड

Patil_p

भुकेल्यांच्या मदतीला धावले पेट्रोलपंप चालक

Patil_p

कोरोनाच्या संकटातून भारत उभारी घेईल !

Patil_p

अटी आणि शर्थींसह सार्वजनिक वाहतूक लवकरच सुरू होईल : नितीन गडकरी

pradnya p
error: Content is protected !!