तरुण भारत

पुणे विभागातील 2 लाख 58 हजार 182 रुग्ण कोरोनामुक्त 

ऑनलाईन टीम / पुणे : 


पुणे विभागातील 2 लाख 58 हजार 182 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 लाख 43 हजार 94 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 75 हजार 987 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 8 हजार 925 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.60 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 75.25 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 

पुणे जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण  2 लाख 31 हजार 196 रुग्णांपैकी 1 लाख 84 हजार 649 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 41 हजार 366 आहे. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 181 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.24 टक्के इतके आहे तर बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 79.87 टक्के आहे. 


आजपर्यत विभागामध्ये एकुण 15 लाख 13  हजार 870 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  3 लाख 43 हजार  94  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 

Related Stories

पुण्यात कोरोनाबाधित महिलेची यशस्वी प्रसूती, बाळ कोरोनामुक्त

prashant_c

सोलापूर : कुर्डुवाडीतील सर्व किराणा व्यापारी निगेटिव्ह

Shankar_P

सोलापूर शहरात बुधवारी नव्याने आढळले 29 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण

triratna

सोलापुरात पुन्हा लॉकडाऊन नाही; बार्शी शहर, तालुक्यात 31 जुलैपर्यंत संचारबंदी

triratna

सोलापूर ग्रामीणची वाटचाल हजाराकडे

triratna

दुबार संसर्गाचा धोका बळावला

triratna
error: Content is protected !!