तरुण भारत

लॉकडाऊनच्या काळात महाराष्ट्रात कोरोना संदर्भात 2.55 लाख गुन्हे

ऑनलाईन टीम / मुंबई : 

महाराष्ट्रात लॉकडाऊन कालावधीत कोरोना संदर्भात कलम 188 नुसार 2 लाख 55 हजार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर 25 कोटी 12 लाखांची दंड आकारणी करण्यात आली, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

लॉकडाऊनच्या कालावधीत म्हणजेच 22 मार्च ते 15 सप्टेंबर पर्यंत कलम 188 नुसार 2,55,756 गुन्हे नोंद झाले असून 34,800 व्यक्तींना अटक करण्यात आली, यातील विविध गुन्हांसाठी 25 कोटी 12 लाख 91 हजार 114 रु. दंड आकारण्यात आला.

हल्लेखोरांवर कडक कारवाईचे आदेश कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपले पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.

Related Stories

कोल्हापूर : ‘लॉकडाऊन’चा आज पहिला दिवस

triratna

सातारा जिल्ह्यातील 47 नागरिकांना डिस्चार्ज; आज सोडले घरी

Shankar_P

पुलाची शिरोली येथे समाज कल्याण विभागाकडून दिव्यांगांना अनुदान वाटप

Shankar_P

रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱया युवकांवर गुन्हा

Patil_p

सातारा : महामार्गावरून चक्क शॉटकट

triratna

ग्रामसमितींच्या खंबीर निर्णयांमुळेच कोरोनाला लगाम

triratna
error: Content is protected !!