तरुण भारत

जम्मू काश्मीरमधील कोरोना रुग्णांची संख्या 58,244 वर

ऑनलाईन टीम / जम्मू : 


जम्मू काश्मीरमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वेगाने फैलावत आहे. मागील 24 तासात 1,590 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 58 हजार 244 वर पोहोचली आहे.  

मिळालेल्या माहितीनुसार, आज मिळालेल्या नव्या रुग्णांमध्ये जम्मूतील 758 आणि काश्मीर मधील 747 जणांचा समावेश आहे. सद्य स्थितीत 19 हजार 503 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये जम्मूतील 10,954 आणि काश्मीरमधील 8,549 जण आहेत. 
त्यातच दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 37 हजार 809 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये 8659 रुग्ण जम्मूतील तर 29, 150 जण काश्मीरमधील आहेत. 


तर आतापर्यंत 932 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये जम्मूतील 185 जण तर काश्मीरमधील 747 जणांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यात 31 हजार 140 लोक होम क्वारंनटाईनमध्ये आहेत तर 19 हजार 503 लोक हॉस्पिटलमधील आयसोलेशन कक्षात आहेत. 

Related Stories

चिंता वाढली : उत्तराखंडात कोरोना रुग्णांची संख्या 20 हजार पार

pradnya p

बडोदा : भीषण स्फोटात 6 जण ठार

prashant_c

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार

Patil_p

अंतरराष्ट्रीय उड्डाणांचीही केली जात आहे तयारी!

omkar B

देशात पहिल्यांदाच कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन

datta jadhav

दिल्लीतील हजरत निजामुद्दीन दर्गा उद्यापासून भाविकांसाठी खुला

datta jadhav
error: Content is protected !!