तरुण भारत

जपानला मिळाला नवा पंतप्रधान

टोकियो

 जपानचे माजी मुख्य सचिव योशिहिडे सुगा यांना औपचारिक स्वरुपात देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. सुगा यांनी दोन दिवसांपूर्वी सत्तारुढ लिबरल डेमोक्रेटिक पार्टीच्या निवडणुकीत दोन नेत्यांना मागे टाकून या पदासाठी स्वतःचे स्थान पक्के केले होते. बुधवारी जपानच्या संसदेत याकरता मतदान झाले आहे. 465 खासदारांपैकी 314 जणांनी सुगा यांना समर्थन दिले आहे. माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी 28 ऑगस्ट रोजी राजीनामा दिल्यापासून हे पद रिक्त होते. आबे यांनी प्रकृतीचा दाखला देत पद सोडले होते. अबे यांना अल्सरेटिव्ह कोलायटिस आजार आहे. 71 वर्षीय सुगा हे आबे यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. याचमुळे आबे यांची धोरणे सुगा कायम ठेवतील असे म्हटले जात आहे. जपानमध्ये आता सप्टेंबर 2021 मध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योशिहिडे यांचे अभिनंदन केले आहे. योशिहिडे यांच्यासोबत मिळून आमची विशेष रणनीति आणि जागतिक भागीदारी नव्या उंचीवर नेण्याची अपेक्षा करत असल्याचे मोदींनी नमूद केले आहे.

Advertisements

सुगा यांच्यासमोरील आव्हाने

घटनेत दुरुस्ती करत स्वयंसंरक्षण दलाला वैधता प्रदान करण्याची सुगा यांची योजना आहे. पूर्ण जग महामारीला तोंड देत असताना सुगा यांना हे पंतप्रधानपद मिळाले आहे. याचमुळे महामारीमुळे झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई करण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. किमान वेतनात वाढ, कृषी सुधारणांना चालना देणे आणि पर्यटनाला प्रोत्साहन देऊन क्षेत्रीय अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचे काम त्यांना करावे लागणार आहे. 1970 आणि 1980 च्या दशकात उत्तर कोरियाने करण्यात आलेल्या जपानी नागरिकांच्या अपहरणाचा मुद्दा सोडविण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे.

Related Stories

तोंडी औषधाचा परिणाम 24 तासांमध्ये

Patil_p

कोरोना लस तयार होऊ नये म्हणून चीनकडून अडथळे

datta jadhav

इराणने भारताला फरजद-बी वायू प्रकल्पातून वगळले

datta jadhav

“हे सारं हृदय पिळवटून टाकणारं आहे,” अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांचं भारताला मदतीचं आश्वासन

Abhijeet Shinde

ब्रिटन अन् भारताची भागीदारी नैसर्गिक

Patil_p

तालिबान नेता अखुंदजादा जिवंत

Patil_p
error: Content is protected !!