तरुण भारत

स्पाइस जेटला 600 कोटींचा फटका

मुंबई  :

हवाई क्षेत्रात कार्यरत असणाऱया स्पाइसजेट या कंपनीला तब्बल 600 कोटींचा फटका बसला आहे. जून 2020 च्या तिमाहीअखेर हा तोटा कंपनीला सोसावा लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विमाने रद्द केली गेल्याने शिवाय प्रवाशांची संख्या घटल्याने हे नुकसान झाले आहे. कंपनीला जून 2020 अखेर 600 कोटींचा एकत्रित तोटा सहन करावा लागला आहे. मागच्या वर्षी कंपनीला 262.8 कोटी रुपयांचा एकत्रित नफा झाला होता. आर्थिक वर्ष 2021 मध्ये पहिल्या तिमाहीत एकत्रित उत्पन्नातही वर्षागणिक पाहता 82 टक्के विक्रमी घसरण झाली आहे.

मार्चअखेर सर्वच विमानसेवा ठप्प झाल्याने अनेक कंपन्या आर्थिक नुकसानीत आल्या. स्पाइसजेटही यातून सुटली नाही. कोरोनाने मोठा परिणाम या सेवेवर जाणवला. भारतातील कंपन्यांसह विदेशातील कंपन्यांनाही कोरोनाचा चांगला फटका बसला आहे.

Related Stories

व्हीडीओ कॉन्फरन्ससाठी एअरटेलचे ब्लूजींस ऍप

Patil_p

सेन्सेक्स-निफ्टीमध्ये पुन्हा परतली तेजी

Patil_p

इन्वेस्टमेंट पोर्टफोलियोचे मूल्य वाढल्याने बर्कशायरचा नफा तेजीत

omkar B

टाटा कॉफीच्या निव्वळ नफ्यात 77 टक्के वाढ

Patil_p

अजूनही चाचपडतो आहे…

Patil_p

कॅनरा बँकेने घटवले दर

Patil_p
error: Content is protected !!