तरुण भारत

विदेशी चलनातील प्रवाहामुळे सेन्सेक्स मजबूत

सेन्सेक्समध्ये 258.50 तर निफ्टीत 82.75 अंकांनी वाढ

वृत्तसंस्था / मुंबई 

चालू आठवडय़ातील तिसऱया दिवशी बुधवारी विदेशी भांडवलातील वाढत्या प्रवाहामुळे एचडीएफसी बँक, आयटी क्षेत्रातील कंपनी इन्फोसिस आणि महिंद्रा ऍण्ड महिंद्राच्या तेजीने सेन्सेक्स मजबूत राहिला आहे. यामध्ये बीएसई सेन्सेक्स 258.50 अंकांनी वधारुन निर्देशांक 39,302.85 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 82.75 अंकांनी वधारुन निर्देशांक 11,604.55 वर स्थिरावला आहे.

सकाळी बाजार सुरु होताना बीएसई सेन्सेक्स 116.66 वाढीने तर निफ्टी यांनी 16.65 च्या तेजीसह प्रारंभ केला होता. दिवसभरात रियॅल्टी, फार्मा आणि ऑटो या क्षेत्रात समभागांची खरेदी झाली आहे. तर निफ्टीमध्ये डॉ. रेड्डीज लॅब आणि महिंद्रा ऍण्ड महिंद्राचे समभाग चार टक्क्मयांनी वाढून बंद झाले आहेत. तसेच रियॅल्टी क्षेत्रात डीएलएफचे समभाग 5 टक्क्मयांच्या वाढीसोबत बंद झाले आहेत. दिवसभरात मात्र बँकिंग क्षेत्रातील समभाग दबावात राहिले आहेत.

यासोबतच इंडसइंड बँकेचे समभाग दोन टक्क्मयांनी घसरले असून ऍक्सिस बँक आणि स्टेट बँकेचे समभाग एक-एक टक्क्मयांनी घसरुन बंद झाले आहेत. समभागातील तेजीच्या जोरावर बुधवारी रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारमूल्य पहिल्यांदाच 16 लाख कोटींच्या पातळीवर पोहोचले आहे. यावेळी कंपनीच्या समभागांनी 2368.8 चा उच्चांक नोंदवला आहे.

अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या मुद्रांक नितीच्या घोषणेच्या अगोदरच जागतिक पातळीवर मिळताजुळता कल राहिला आहे. यामध्ये लिलाव आणि विदेशी भांडवलाच्या प्रवाहामुळे देशातील शेअर बाजार मजबूत स्थितीत राहिले आहेत. विदेशी संस्थांच्या गुंतवणुकीमुळे मंगळवारी निव्वळ स्वरुपात 1,170.79 कोटी रुपयांच्या मूल्याच्या समभागांची खरेदी झाली आहे. या घटनेचा लाभ सेन्सेक्सला झाल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 12 पैसे मजबुत झाला आहे. 

Related Stories

प्रारंभीची घसरण सावरत सेन्सेक्सची 243 अंकांची झेप

Patil_p

आर्थिक घोषणेमुळे बाजारात तेजीची उसळी

Patil_p

मिल्कबास्केट, अर्बन लॅडरवर रिलायन्सचा डोळा

Patil_p

स्टेट बँक 14 हजार जणांची भरती करणार

Patil_p

दुचाकी वाहन विक्रीवर कोरोनाचा प्रभाव?

Patil_p

बीएसएनएल 18 हजार कोटींची संपत्ती विकणार

Patil_p
error: Content is protected !!