22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

विवाहीतेच्या मृत्यू प्रकरणी सासू, सासरे व नणंदेला अटकपूर्व जामीन

वार्ताहर/ राजापूर

राजापूर तालुक्यातील हसोळ येथील अंकीता गणेश कुळये (20) या गर्भवती महिलेच्या मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या विवाहीतेच्या सासू, सासऱयांसह नणंदेला जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आरोपींच्या वतीने ऍड.शशिकांत सुतार यांनी काम पाहिले.

हसोळ येथील अंकीता गणेश कुळये (20) या गर्भवती महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला होता. अंकीताच्या मृत्यूला नवरा आणि सासरची मंडळी जबाबदार असल्याची तक्रार अंकीताचा भाऊ दर्शन सहदेव जोगले (ससाळे) याने राजापूर पोलिस स्थानकात दिली आहे. त्यानुसार राजापूर पोलिसांनी भादंवि कलम 478 अ व 306 प्रमाणे गणेश जयराम कुळये (24) व त्याचे वडील जयराम संभाजी कुळये (70) व आई राजेश्री जयराम कुळये (65) बहीण मेघना मंगेश जोगले यांचेविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी गणेश याला पोलिसांनी अटक केली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. उर्वरीत आई, बहीण, वडील यांचेवतीने रत्नागिरी येथील जिल्हा सत्र न्यायालय यांचे न्यायालयात त्यांनी अटकपूर्व जामीन मिळवणेसाठी अर्ज दाखल केला होता. त्याकामी जिल्हा सत्र न्यायाधिश एल.डी.भिले यांनी त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. आरोपी यांचे वतीने ऍड.शशिकांत गणपत सुतार यांनी काम पाहीले.

Related Stories

रत्नागिरी जिल्ह्यात ३२ वा बळी नव्याने ३५ पॉझिटिव्ह

triratna

दुचाकीस्वारांवर पुन्हा पोलीस कारवाई हाती

NIKHIL_N

तीन दिवस वादळी पावसाचा इशारा

Patil_p

जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाचे दोन बळी

triratna

लाचप्रकरणी तत्कालीन भरणे ग्रामसेवकाचे निलंबन

Patil_p

साताडर्य़ात शाळकरी मुलाचा नदीत बुडून मृत्यू

NIKHIL_N
error: Content is protected !!