तरुण भारत

दापोलीतील विद्यार्थी ‘विद्ये’साठी रानमाळावर!

वार्ताहर/ मौजेदापोली

‘विद्ये’विना नाही उच्चस्थान जगामध्ये,

Advertisements

चल गडय़ा घेऊ आपण ‘ऑनलाईन’चे धडे’

असे बोलत पंचनदी येथील श्री यशवंत रामचंद्र कुटरेकर माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी दीड ते दोन कि.मी.चा पायी प्रवास करत रानमाळावर विद्यालेखनासाठी जात आहेत. यासाठी काहींनी झोपडय़ा बांधल्या आहेत, तर काहीजण झाडांचा आसरा घेत आहेत. या शिक्षकांच्या धडपडीमुळे शिक्षणाचे महत्व स्पष्ट होत असले तरी ऑनलाईन शिक्षणाच्या अडचणीही अधोरेखित होत आहेत.

   कोरोनाचे संकट आल्यामुळे देशभरात ऑनलाईन शिक्षणाची पद्धत अवलंबण्यात आली आहे. शाळा भरवणे शक्य नसल्यामुळे शाळांमध्ये ऑनलाईन पद्धतीने शिक्षण दिले जात आहे. तर काही शाळांमधून व्हॉटसऍप ग्रुप बनवून अभ्यास पाठवून दिला जात आहे. परंतु ग्रामीण भागांमध्ये काही विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाहीत, तर काही ठिकाणी मोबाईलला नेटवर्क नाही. त्यामुळे अनेक समस्यांना विद्यार्थ्यांना समोर जावे लागत आहे.

  अनेक अडचणी असल्या तरी शिकण्याची जिद्द असली की, आपण ते कशाही प्रकारे शिकू शकतो, हे आज पंचनदी येथील विद्यार्थी करून दाखवत आहेत. येथील विद्यार्थी ज्या ठिकाणी रेंज मिळेल त्या ठिकाणी पुस्तक, वहय़ा घेऊन जातात. य. रा. कुटरेकर विद्यालयातील विद्यार्थी रानामध्ये जाऊन अभ्यास करतात. पंचनदी पंचक्रोशीत पंचनदी, आघारी, बोरीवली, वनौशी, दुमदेव ही गावे येतात. या ठिकाणच्या काही विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नसल्यामुळे एकाच मोबाईलवर अभ्यास करावा लागत आहे. पंचनदी येथील धीरज पाते, साहिल पाते, अंकिता कुटरेकर हे विद्यार्थी एकाच मोबाईलच्या माध्यमातून एकत्रित अभ्यास करतात. बोरीवली येथील निर्जना शिगवण, मानसी शिगवण, विशाखा घुबडे, सायली शिगवण, प्राची शिंदे, प्राजक्ता शिंदे या विद्यार्थिंनी ऊंच ठिकाणी झाडाखाली बसून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत.

  वनौशी खोंडारन तेथील विद्यार्थ्यांनी तर ऑनलाईन शिक्षणासाठी जंगलात झोपडी बांधली आहे. येथे जाऊन हे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. तर वनौशी, आघारी, बोरीवली येथे मोबाईल नेटवर्कला अडचण असल्यामुळे येथील विद्यार्थी उंच ठिकाणी अर्थात नेट मिळेल, अशा ठिकाणी जाऊन झाडाखाली बसून अभ्यास करत आहेत. तर वसतिगृहात राहणाऱया पाच-सहा विद्यार्थ्यांचा अभ्यास मात्र रेंजअभावी बुडत आहे. बाकी सर्व विद्यार्थी कोणत्या-नöकोणत्या माध्यमातून विद्यालेखन करत आहेत. शिक्षणाची आवड असल्यावर एकादी व्यक्ती कुठेही कशाही प्रकारे अभ्यासासाठी धडपड करते, याचे उदाहरण आज पंचनदी येथील विद्यार्थी जणू सार्थक ठरवत आहेत.

विद्यार्थ्यांनीच शोधले उपाय

पंचनदी येथील य. रा. कुटरेकर महाविद्यालयाचे दहावीत शिकणाऱया विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास सुरू आहेत. व्हिडीओ कॉलद्वारे विद्यार्थ्यांना शिकवले जात आहे. परंतु विद्यार्थ्यांना रेंज असल्यामुळे अनेक अडचणी येत होत्या. परंतु विद्यार्थ्यांनीच आपल्या शिक्षणासाठी उपाययोजना शोधून काढल्या आहेत.

– आशुतोष साळुंखे, शिक्षक

य. रा. कुटरेकर

Related Stories

मालवण येथे २० ऑक्सिजन बेडचे कोविड सेंटर सुरु

Ganeshprasad Gogate

चिपळूण पूरस्थितीवर नियंत्रण शक्य – डॉ. श्रीरंग कद्रेकर

Abhijeet Shinde

घाणेखुंट ग्रामपंचायत परिसर दीडशेहून अधिक एलईडी पथदीपांनी उजळला!

Patil_p

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे 22 नवे रुग्ण

Abhijeet Shinde

जिल्हय़ात ग्राम कृतीदल अध्यक्ष नियुक्तीचा ‘गोंधळात गोंधळ’

Patil_p

रत्नागिरी : दापोलीत कोविड सेंटरची क्षमता वाढणार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!