तरुण भारत

साखळी मतदार संघात विविध कार्यक्रम..!

साखळी/प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 17 सप्टेंबर 70 व्या वाढदिवसानिमित्त साखळी मतदार संघात “सेवा सप्ताह” साजरा करुन विविध कार्यक्रमांचे आयोजन साखळीचे आमदार तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती भाजप साखळी मंडळ अध्यक्ष  गोपाळ सुर्लकर यांनी साखळी भाजप कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.यावेळी जे÷ कार्यकर्ते संतोष मळीक व विनय पांगम यांचीही उपस्थिती होती.

मंडळ अध्यक्ष सुर्लकर यावेळी बोलताना म्हणाले पंतप्रधान मोदीचा 70 वा वाढदिवस हा येत्या 17 सप्टेंबर रोजी असून त्याप्रित्यर्थ भाजपतर्फे संपुर्ण भारतभर सेवा सप्ताहास 14 सप्टेंबर पासून प्रारंभ झाला आहे त्याची सांगता येत्या 20 सप्टेंबर रोजी होईल.त्याचाच भाग म्हणून  साखळी मतदार संघातील सात पंचायतीमध्ये भाजप तर्फे विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान  मोदींचा वाढदिवस साखळी येथील सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना फळे वाटून करण्यत येणार आहे. त्याचप्रमाणे मतदार संघातील प्रत्येक पंचायतीत व साखळी पालिका क्षेत्रात असलेल्या मतीमंद व अपंग मुलांना फळे वाटणार तसेच त्यांची चौकशी करून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना आवश्यक ती मदत व्हिल चेअर, श्रवण यंत्रे आदी सामाजिक दृष्टीने मदत करणार आहे. दि.17 ते 20 सप्टेंबर साखळी पालिका व सात पंचायतीमध्ये स्वच्छता मोहिम राबवणार आहे. त्याचप्रमाणे या सेवा सप्ताह काळात भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे “वनमहोत्सव” व “प्लास्टिक निर्म?लन” जनजागृती मोहिम हाती घेण्यात येणार आहे. दि 25 सप्टेंबर रोजी पं.दिनदयायाळ उपाध्याय यांची जयंतीही भाजप तर्फे सर्व पंचायत क्षेत्रात  साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी मुख्य कार्यक्रम साखळीत होणार संध्या.5 वा.माजी सभापती राजेंद्र आर्लेकर साखळी येथे उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.या शिवाय “लोकल टू वोकल” – “आत्मनिर्भर भारत” हा मोदींनी दिलेला मोठा संदेश याची माहितीसाठी

 जनजागृती मोहिम प्रत्येक पंचायत क्षेत्रात राबवण्यात येणार आहे.सर्व कार्यक्रम मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या मार्गदर्शन खाली साजरे करण्यात येणार आहेत यासाठी सर्व भागातील भाजप कार्यकर्ते तळमळीने कामाला लागले आहेत अशी माहितीही साखळी भाजप मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. संतोष मळीक यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

Related Stories

वनखात्यानेच लावली हुळर्ण डोंगराला आग

Omkar B

मांगोरहिलमध्ये वाढते रुग्ण… वाढती अस्वस्थता !

Omkar B

काँग्रेस पक्षाची राज्य निवडणूक आयोगावर टीका

Amit Kulkarni

काणकोण कदंब बसस्थानक परिसराचे निर्जंतुकीकरण

Omkar B

अटक केलीच तर 25 हजारांच्या बॉण्डवर सोडा

Patil_p

मातेला दूर ठेवणाऱया मुलाविरुद्ध गुन्हा नोंद

Patil_p
error: Content is protected !!