तरुण भारत

सातारा : अपघातग्रस्त ट्रक चालकास पोलिसांनी घेतले ताब्यात

सातारा / प्रतिनिधी
वाई येथील बावधन नाक्यावर अज्ञात मालट्रकने साहेबराव गोपाळ कसबे या पादचाऱ्यास पाठी मागुन धडक देऊन जखमी केल्याची घटना दि.16 रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातातील मालट्रकचा शोध वाई पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने लावून ट्रक चालकास ताब्यात घेतले.
वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की वाई येथील बावधन नाका येथे अज्ञात वाहनाने धडक देऊन एकास जखमी केल्याची घटना घडली. जखमी होऊन रस्त्याकडेला बेशुद्ध अवस्थेत पडले होते. मालट्रकचा चालक मालट्रक सह पाचगणीच्या दिशेने पळून जाण्यास यशस्वी झाला होता.या अपघाताची माहिती अज्ञाताने वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांना फोनद्वारे दिली. त्यांनी रात्र गस्तीवर असणारे पोलीस कर्मचारी संजय पवार, सिध्देश्वर वाघमोडे यांना सूचना देताच ते अपघात स्थळावर पोहचुन त्यांनी जखमीला तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी हवालदार एस. एस. जाधव, गुन्हे प्रगटीकरण शाखेचे एस. बी. राठोड यांना सोबत घेऊन पहाटे अपघात करुन पळून गेलेल्या मालट्रकचा शोध घेण्यासाठी वाई सातारा रोडवरील वाई एसटी स्टँड ते भिम नगर तिकाटणे आणि पाचगणी या रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या सीसीटीव्हीच्या फुटेजचा आधार घेत घेत अवघ्या काही तासातच ही पोलीस यंत्रणा पाचगणी परिसरात असणाऱ्या गोडोली (ता. महाबळेश्वर) येथे जाऊन मालट्रक चालक धनराज कृष्णदेव मालुसरे याच्यापर्यंत पोहचले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सापडलेल्या मालट्रकचा नंबर आणि उभा असलेल्या मालट्रकचा नंबर एकच असल्याची खात्री झाल्यानंतर संशयितास पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी चालक धनराज मालुसरे यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्यांने सुरवातीला उडवा उडवीची उत्तरे दिली. चालकासह मालट्रक ताब्यात घेऊन वाई पोलिस ठाण्यात आणल्यावर गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्यावर गुन्हा दाखल करून ट्रक जप्त करण्यात आला असून वाई पोलीस तपास करत आहेत.

Related Stories

जिल्ह्यात बाधित वाढीचा वेग मंदावला

datta jadhav

सातारा : फरसाणा कंपनीला भीषण आग; 2 कोटींचे नुकसान

datta jadhav

जिल्ह्यात दोन हजारपेक्षा जास्त रुग्णवाढ सुरुच

datta jadhav

सातारा : प्रतापसिंहनगरात तलवार हल्ला करणाऱ्या दोघांना अटक

datta jadhav

सातारा : श्रीयमाई देवीची हंसवाहिनी सरस्वती देवीच्या रूपात सालंकृत पूजा

Abhijeet Shinde

जिल्ह्यात रुग्णवाढीने पुन्हा हजारी ओलांडली

datta jadhav
error: Content is protected !!