तरुण भारत

देशात 97,894 नवे कोरोना रुग्ण; एकूण रूग्णसंख्या 51 लाखांवर

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

भारतात मागील 24 तासात 97 हजार 894 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 1132 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 51 लाख 18 हजार 254 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 83 हजार 198 एवढी आहे. 

Advertisements

सध्या देशात 10 लाख 09 हजार 976 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 40 लाख 25 हजार 080 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

आतापर्यंत देशात 6 कोटी 05 लाख 65 हजार 728 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 11 लाख 36 हजार 613 रुग्णांची तपासणी बुधवारी एका दिवसात करण्यात आली. 

Related Stories

स्थलांतरीत कामगारांची वैद्यकीय तपासणी मोफत करा

Abhijeet Shinde

मोबाईल, टीव्ही, फ्रिजची ऑनलाईन विक्री सोमवारपासून

prashant_c

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण

Abhijeet Shinde

मूलचंद कंपाउंमधील दोन गोदामे जळून खाक

prashant_c

सैनिकांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी मोदी अचानक लेह-लडाखमध्ये दाखल

datta jadhav

१०८ वर्षांच्या आजींनी घेतले लसींचे दोन्ही डोस; जयंत पाटलांनी साडीचोळी देऊन केला सत्कार

Abhijeet Shinde
error: Content is protected !!