तरुण भारत

सांगली :ऑक्सिजनसाठी डॉक्टरच बनले चालक

आटपाडी /प्रतिनिधी

आटपाडी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर इम्रान तांबोळी कोरोनाच्या युद्धात अग्रभागी आहेत. लोकांमध्ये जागृती करतानाच उपचारात आघाडी घेत डॉक्टर तांबोळी यांनी पडेल ती सर्व जबाबदारी पार पाडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ऑक्सिजनची कमतरता दूर करण्यासाठी चक्क वाहनाचे चालक बनून डॉक्टर तांबोळी यांनी ऑक्सिजन सिलेंडरची झटपट वाहतूक केली त्यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आटपाडी तालुक्यात बाधित संख्या एक हजाराच्या पुढे गेलेलीआहे दिवसेंदिवस संख्या वाढत असून ऑक्सीजन अभावी अनेकांचे हाल होत आहेत. अशा स्थितीत ग्रामीण रुग्णालयातील कोविड हेल्थ सेंटरमध्ये कोरोना रूग्ण वाचवण्यासाठी अतोनात प्रयत्न सुरू आहेत. आटपाडीतीळ डॉक्टर तांबोळी आणि त्यांचे सहकारी रुग्णांवरील उपचारासाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत अशाच त्यांच्या कामाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे डॉक्टर इम्रान तांबोळी हे आपल्या सहकाऱ्यांसह ॲम्बुलन्समधून ऑक्सिजन आणण्यासाठी त्या वाहनाचे सारथ्य केले.
कोरोनाचा फैलाव आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा कष्ट घेत आहे. त्यात डॉ.तांबोळी व सहकाऱ्यांनी ऑक्सिजनसाठी केलेल्या रात्रीच्या युद्ध पातळीवरील कामाचे कौतुक होत आहे.

Advertisements

Related Stories

मराठा क्रांती मोर्चातर्फे माजी मंत्री सुरेश खाडे यांच्या दारात हलगी बजाव

triratna

सांगली : मिरजेत घोरपडीची तस्करी करणारे दोघेजण ताब्यात

triratna

बेकायदशीर होर्डिंग्जवर कारवाईचा बडगा

triratna

सांगली : तब्बल २५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर ‘कृष्णा’ जत पूर्वभागात!

triratna

वारणेसह `ही’ पाच धरणे पन्नास टक्के भरली, विसर्ग सुरु

triratna

द्राक्ष बागा नुकसानीबाबत सांगलीत आढावा बैठक

triratna
error: Content is protected !!