तरुण भारत

ड्रग रॅकेट : दोन चित्रपट कलाकारांची चौकशी, तर एका तस्कराला अटक

बेंगळूर/प्रतिनिधी

कन्नड फिल्म इंडस्ट्रीत ड्रग रॅकेटच्या सक्रियतेची चौकशी करणार्‍या सेंट्रल क्राइम ब्रँचने (सीसीबी) बुधवारी आणखी दोन कलाकारांची चौकशी केली. अभिनेता दिगंत मंचले आणि आंद्रेता रे यांची बुधवारी सँडलवुड ड्रग प्रकरणी चौकशी केली गेली. गरज भासल्यास त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, बुधवारी पोलिसांनी मूळचा आफ्रिकन असलेला ड्रग्स तस्कर बेनाल्ड उडेना याला अटक केली. बेनाल्डने तीन वेगवेगळ्या नावाखाली पार्टीना ड्रग्स दिले आहे.

या प्रकरणात पोलिसांनी अनेक लोकांवर गुन्हे दाखल केले असून अभिनेत्री रागिनी द्विवेदी, संजना गलराणी, पार्टी संयोजक वीरेन खन्ना यांच्यासह अनेकांना अटक केली असल्याचे सांगण्यात आले. कन्नड चित्रपटसृष्टीत ड्रग रॅकेट आणि राज्याच्या विविध भागांत सुरू असलेल्या तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या कन्नड चित्रपटाची अभिनेत्री रागिनी द्विवेदीच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे.

Advertisements

Related Stories

कर्नाटक सरकारचा डिसेंबरमध्ये शाळा पुन्हा सुरू करण्याचा विचार

triratna

राज्यात ३ हजार लसीकरण केंद्रे कार्यान्वित होणार : आरोग्यमंत्री

triratna

बेंगळूर: बापूजी नगरमधील केमिकल फॅक्टरीला आग

triratna

कर्नाटक: तालुक्यातील रुग्णालयात भूलतज्ञांची कमतरता

triratna

केरळ आणि महाराष्ट्रातून प्रवासी गोव्यामार्गे कर्नाटकात होतायेत दाखल

triratna

मालमत्ता कर वसुलीसाठी पालिका उपाययोजना करणार

triratna
error: Content is protected !!