तरुण भारत

महाराष्ट्र : मराठा आरक्षणासाठी सर्वत्र आंदोलन सुरु

ऑनलाईन टीम / मुंबई : 

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याप्रकरणी न्यायालयात समाजाची बाजू मांडण्यासाठी सरकार कमी पडले आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाचा निर्णय घ्यावा या मागणीसह संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विविध संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. 

Advertisements
  • जालन्यात राजेश टोपेंना घेराव

मराठा समाजाचा आरक्षणाचा तिढा सुटवा यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघाने पालकमंत्री राजेश टोपे यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला.

  • पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा  संघटनांचे आंदोलन सुरू आहे. या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जमावाने काळ्या फिती बांधून सरकारच्याविरोधात घोषणा देत आहेत. दरम्यान, मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये न्यायालयाने दिलेली स्थगिती राज्याने तात्काळ उठवावी अशी मागणी करण्यात आली आहे. 

  • औरंगाबादेत ढोल बजाव 

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि ठाकरे सरकारमधील शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांच्या घरासमोर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्त्यांनी ढोल बजाव आंदोलन केले. मराठा समाजाला न्याय देण्यासाठी अध्यादेश काढण्यात यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

Related Stories

कोल्हापूर : काळाम्मावाडी धरण ७६.४१ टक्के भरले, दुधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर

triratna

मुंबईला आज ऑरेंज अलर्ट; पुढील 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता

Rohan_P

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ‘एम्स’ रुग्णालयात दाखल

datta jadhav

मुंबईत आजपासून तीन दिवस ‘वॉक इन’ लसीकरण

Rohan_P

कोल्हापूर : अखेर पाचगावमध्ये कोरोनाचा शिरकाव

triratna

सरकार माझ्यावर पाळत ठेवतंय ; संभाजीराजेंचा खळबळजनक दावा

triratna
error: Content is protected !!