तरुण भारत

खेडमध्ये पाच जणांना चाकूच्या धाकाने ५९ लाखाला लुटले

प्रतिनिधी / खेड

कमी किमतीत सोनं देतो, अशी बतावणी करत दोन किलो सोने खरेदीच्या व्यवहारासाठी घेवून गेलेल्या ५ जणांना सात ते आठ जणांच्या टोळीने चाकूचा धाक दाखवत ५९ लाखाला लुटल्याची घटना महामार्गावरील उधळे येथील कामाक्षी पेट्रोलपंपालगतच्या जंगलात बुधवारी सायंकाळी उशिरा घडली. पाच जणांमध्ये एका राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्मचाऱ्यासह पतसंस्थेचा कर्मचारी, एक शिक्षक व अन्य दोघांचा समावेश आहे. याप्रकरणी बुधवारी रात्री उशिरा अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी महामार्गावर रात्रभर ठिकठिकाणी नाकाबंदीही केली. मात्र, चोरटे पोलिसांच्या हाती लागले नाहीत. चोरट्यांच्या शोधार्थ पोलिसांची दोन पथके रातोरात वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली आहेत. या टोळीतील सर्वजण दुचाकीने उधळेनजीक आले असता पाचजणांना सोने खरेदीसाठी जंगलात बोलावले. हे पाचजण तेथे गेल्यानंतर टोळीने चाकूचा धाक दाखवत त्यांच्याकडील ५९ लाख रूपयांची रोकड असलेली बॅग हिसकावून नेली. पोलीस उपविभागीय अधिकारी प्रवीण पाटील, पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की साऱ्या शक्यतांचा पडताळा करत आहेत. एवढी मोठी रक्कम घेवून जंगलात जाण्याचे कारण काय? एवढी मोठी रक्कम आली कुठून? या आणि अशा प्रश्नांचा भडिमार केला जात असून पाचही जणांची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

Advertisements

Related Stories

आंबा, काजू, मच्छी निर्यात वृध्दीसाठी ‘ऍक्शन प्लॅन’

Patil_p

दिवाळीची लगबग सुरु; काळजी घेण्याची गरज

Patil_p

गुहागर-चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर चिखलात

Patil_p

जिल्हय़ात 235 एसटी कर्मचाऱयांची सेवा समाप्त

Patil_p

जिल्हा मंडप, लाईट, केटरर्स असोसिएशनने केला सरकारचा निषेध

Patil_p

शिवेंद्रराजे राष्ट्रवादीत आले तर पालिकेची जबाबदारी त्यांच्यावर

Patil_p
error: Content is protected !!